शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

जिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड शिवकर ग्रामपंचायत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:47 PM

स्मार्ट ग्राम योजना : रायगड जिल्ह्यामधील ८०९ ग्रामपंचायतींमधून निवड

वैभव गायकर।

पनवेल : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित केल्या गेलेल्या स्मार्ट ग्राम योजना २०१८-२०१९ मध्ये पनवेलमधील शिवकर ग्रामपंचायतीने जिल्ह्यात प्रखम क्रमांक पटकाविला आहे. रायगड जिल्ह्यामधील १५ तालुक्यांतील ८०९ ग्रामपंचायतीमधून शिवकर ग्रामपंचायतीची निवड झाली असून, ५० लाखांचे पारितोषिक शिवकर ग्रामपंचायतीला मिळणार आहे.

या योजनेंतर्गत स्वच्छता, दायित्व, व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शक व तंत्रज्ञान आदी निकषांमध्ये शिवकर ग्रामपंचायतीने १०० पैकी ९४ गुण मिळवले. दुसरा क्रमांक रोहा तालुक्यातील धोंडखार तर तिसरा क्रमांक उरणमधील चिरनेर या ग्रामपंचायतीला मिळाला आहे. तालुक्यात अव्वल आल्याने या दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. १८ सप्टेंबर रोजी अलिबागच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत जिल्हास्तरीय समितीने रायगड जिल्ह्यातील १५ गटांतील तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या ग्रामपंचायतींच्या गुणांची पडताळणी केली होती. सध्या शिवकर ग्रामपंचायतीची लोकसंख्या २,४३४ असून, एकूण क्षेत्रफळ २६१ हेक्टर आहे. यापैकी १६८ हेक्टर जागेवर शेती केली जाते. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रेरित केली जाते. याकरिता निम्मा खर्च ग्रामपंचायत उचलते. संपूर्ण नैसर्गिकरीत्या भातशेती करणाºया शेतकºयाकडून ग्रामपंचायत शासनाच्या जादा दराने भात खरेदी करते. सरपंच अनिल ढवळे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीद्वारे डिजिटल दवंडी, शोष खड्ड्याद्वारे सांडपाण्याचा निचरा, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही, ग्रामपंचायतीचा कारभार आॅनलाइन, महिला सक्षमीकरणासाठीचे उपक्रम आदींसह विविध उपक्रम राबविले गेले आहेत. लवकरच हा पारितोषिक समारंभ पार पडणार आहे. जिल्ह्यात स्मार्ट ग्रामपंचायत योजनेत प्रथम क्रमांक पटकाविल्याने शिवकरचे सरपंच अनिल ढवले यांनी आनंद व्यक्त केला.ग्रामपंचायती स्वच्छता दायित्व व्यवस्थापन अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण पारदर्शक व तंत्रज्ञान मिळालेले गुण१) शिवकर २० १६ २३ २० १५ ९४२) धोंडखार १९ १९ २० १९ १५ ९१३) चिरनेर २० ११ २२ २० १५ ८८शिवकर ग्रामपंचायतीला राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचविण्याचा संपूर्ण गावाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Raigadरायगड