महाड : महाड तेरा ग्रामपंचायतींपैकी अकरा ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेस पक्षाला केवळ दोन ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळाली आहे.मतमोजणी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये करण्यात आली.विजयी थेट सरपंचांमध्ये तळोशी- मंगेश पार्टे, किंजळोली खुर्द - अश्विनी केंद्रे, चांढवे बुद्रुक- रूबीना अंतुले, शेल - कमल काटेकर, कोथुर्डे -अंकिता पवार, नेराव- सुनील कोर्पे, किय - नारायण वाडकर, रावढळ -राजाराम मांडवकर, तेलंगे - सरिता राणे, टोळ - शीतल खराळे, आणि नांदगांव खुर्द -मयूर महाडिक हे शिवसेना उमेदवार विजयी झाले तर तेलंगे मोहोल्ला -जफर झटाम आणि राजेवाडी-सुरैय्या सावंत हे दोघे काँग्रेस उमेदवार विजयी झाले.कोंडीवते ग्रमपंचायतीमध्ये सरपंच आणि काही जागा बिनविरोध झाल्या असून, तीन जागांसाठी मतदान झाले त्या शिवसेनेने जिंकल्या आहेत.या विजयानंतर महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. भरत गोगावले यांनी महाड विधानसभा मतदार संघातील ५३ ग्रामपंचायतींपैकी शिवसेनेने ३५ ग्रामपंचायतींवर सेनेचे सरपंच निवडून आले असल्याचे सांगितले.सुधागड निवडणुक शेकापची बाजीराबगाव/ पाली : सुधागड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींमध्ये १४ पैकी नांदगाव व गोमाशी या दोन्ही ग्रामपंचायती शेकापने बिनविरोध घेतल्या तर पाली ग्रामपंचायतीवर बहिष्कार टाकल्याने निवडणूकच झाली नाही.उर्वरित ११ पंचायतीमध्ये शेकापने रासळ , राबगाव , पाचापूर , महागाव ग्रामपंचायती काबीज केल्या तर , कळंब (महाआघाडी) , नाडसूर (ग्रामविकास आघाडी), जांभूळपाडा(भाजपा), भार्जे (राष्ट्रवादी काँग्रेस), दहिगाव (आघाडी), परळी (आघाडी), नवघर (राष्ट्रवादीशेकाप आघाडी)असे यश संपादन केले आहे.शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली असून शिवसेनेला हा गड राखण्यात यश आले नाही. तर जांभूळपाडा ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष गणेश कानडे यांनी आपल्या पत्नीला निवडून आणून भाजपाचे वर्चस्व सिध्द केले आहे. राष्ट्रवादीला फक्त एकाच ग्रामपंचायतीवर सरपंच निवडणूक आणून समाधान मानावे लागल आहे . शेकापचा बालेकिल्ला असणारी नाडसूर ग्रामपंचायतीवर एका नवनिर्वाचित कार्यकर्त्याने ग्रामविकास आघाडीचा झेंडा फडकविला आहे.सुधागडात झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली असून, मागील झालेल्या १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपेक्षा आता मात्र राष्ट्रवादी पक्षाची पीछेहाट झालेली दिसत आहे. पाली ग्रामपंचायतीचा सर्वपक्षीय बहिष्कार हा मुद्दा तापत राहाणार असून त्यातून मार्ग काय निघतो याकडे पालीवासीयांचे आता लक्ष लागून राहिले आहे.
महाडमधील ग्रामपंचायतींंवर शिवसेनेचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:52 AM