‘शिवशाही’ बससेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 03:07 AM2018-05-16T03:07:17+5:302018-05-16T03:07:17+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोठ्या दिमाखामध्ये सुरू केलेल्या शिवशाही बससेवेचा वेळेचे बंधन न पाळल्यामुळे पुरता बोजवारा उडत आहे.

'Shivshahi' bus service will be destroyed | ‘शिवशाही’ बससेवेचा बोजवारा

‘शिवशाही’ बससेवेचा बोजवारा

Next

अलिबाग : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोठ्या दिमाखामध्ये सुरू केलेल्या शिवशाही बससेवेचा वेळेचे बंधन न पाळल्यामुळे पुरता बोजवारा उडत आहे. शिवशाहीसाठी परिवहन विभागाने विविध खासगी टॅÑव्हल्स कंपन्यांशी करार केला आहे. त्यामुळे शिवशाही बसेसवर चालक खासगी कंपनीचे, तर वाहक हे परिवहन महामंडळाचे आहेत. खासगीकरणातून ठेवण्यात आलेले चालक हे महामंडळाच्या कोणत्याच अधिकाऱ्यांना जुमानत नाही, तर आगारातील व्यवस्थापक प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे देतात. याविरोधात अलिबाग येथील प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
स्पर्धेच्या युगामध्ये विविध टॅÑव्हल्स कंपन्यांनी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी, वातानुकूलित बसेस आपापल्या ताफ्यात उतरवल्या आहेत. शिवाय, या टॅÑव्हल्स कंपन्या कमी-अधिक भाडे आकारत असल्याने प्रवाशांचा ओढा त्यांच्याकडे अधिक प्रमाणात गेला होता. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळ तोट्यात चालले होते. यातून मार्ग काढण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सेमी खासगीकरणाच्या माध्यमातून शिवशाही बसेस सुरू केल्या. प्रत्येक आगाराच्या ताफ्यामध्ये शिवशाही बसेस देण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
शिवसेनेने शिवशाही बससेवा सुरू करण्याचा निर्णय अमलात आणला खरा. मात्र, बससेवेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना प्रचंड असुविधा होत आहेत. या बसेस वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना सुमारे सहा-सहा तास शिवशाही बसेसची ताटकळत वाट बघावी लागते. आगाऊ आरक्षण केल्यामुळे प्रवाशांना गाडीची वाट बघण्यावाचून कोणताच पर्याय नसतो. गाड्या वेळेवर फलाटावर लागत नाहीच, शिवाय त्या वेळेवरही सुटत नाहीत. त्याचा प्रचंड त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे.
१२ मे रोजी अलिबाग-कोल्हापूर शिवशाही बस अलिबाग आगारातून सायंकाळी ६ वाजता सुटणार होती. त्याचे आरक्षणही करण्यात आले होते. मात्र, ६ला सुटणारी शिवशाही बस रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी सुटली. ६ची बस असल्यामुळे किमान अर्धा तासआधी आम्ही आगारात आलो होतो. त्यामुळे तब्बल पाच तास ताटकळत वाट बघत बसावे लागले. सोबत माझी ६७ वर्षांची आई आणि मामीसुद्धा होती. त्यांना खूप त्रास झाला, असे अलिबाग-कोल्हापूर प्रवास करणाºया प्रज्ञा देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गाडीला उशीर का होत आहे, याची माहिती घेतली असता कोल्हापूरहूनच ती बस सकाळी ९.३० वाजता सुटली होती. त्यामुळे तिला पुढे उशीर होत गेला, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्या गाडीवरील खासगी चालकाने उशीर केल्याचे वाहका (कंडक्टर)ने सांगितल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कोल्हापूर येथे १३ मे रोजी सकाळी ९ वाजता महत्त्वाची बैठक होती. त्यामुळे १२ मे रोजी सायंकाळी ६च्या अलिबाग-कोल्हापूर शिवशाही बसचे आरक्षण केले होते; परंतु बस रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी सुटल्याने दुसºया दिवशीची बैठक खोळंबली, असे एका प्रवाशाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
शिवशाही बसेस सेमी खासगीकरणातून चालवणे सरकारला जमणार नसेल, तर परिवहनमंत्र्यांनी थेट महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्याच चालक, वाहकांकडून त्या चालवाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्ता ढवळे यांनी केली. या प्रकरणी लवकरच पेण येथील विभाग नियंत्रकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिवशाही बससेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सरकार प्रवाशांचा अंत बघत आहे. व्यवस्थित कारभार करता येत नसेल, तर करू नका. त्यासाठी प्रवाशांना कशाला वेठीस धरता? आगारामध्ये तक्रारवहीच नसते.
आगारप्रमुखाला विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. हे आता खपवून घेतले जाणार नाही. यासाठी सर्व प्रवाशांनी संघटित व्हावे, असे आवाहन अलिबाग प्रवासी संघटनेचे दिलीप जोग यांनी केले. दरम्यान, पेण येथील विभाग नियंत्रकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
>अलिबाग बस स्थानकातून सुटणाºया शिवशाही
अलिबाग-मुंबई अलिबाग- स्वारगेट अलिबाग-शिर्डी अलिबाग-कोल्हापूर मुरुड- स्वारगेट
मुरुड-शिर्डी
यासह अन्य बसेसचा समावेश आहे.

Web Title: 'Shivshahi' bus service will be destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.