शिवशाहीला वाहतूककोंडीचे ग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 12:07 AM2019-01-28T00:07:30+5:302019-01-28T00:07:49+5:30
पेणमध्ये अरुंद रस्ते; फेऱ्यांचा मार्ग बदलल्याने प्रवाशांना त्रास
- सिकंदर अनवारे
दासगाव : सिकंदर अनवारे : महाड आगारातून सुटणारी शिवशाही बस यापूर्वी रामवाडी येथे जाऊन थेट पनवेल गाठत होती. मात्र, या फेरीत पेण परिवहन कार्यालयाने बदल करून शिवशाही बस पेण आगारात नेण्याचे फर्मान काढले. यामुळे चालकांना पेणमधील वाहतूककोंडीतून आणि अरुंद रस्त्यातून वाट काढत पेण आगार गाठावे लागत आहे. परिणामी, जलद प्रवासाची अपेक्षा ठेवून शिवशाहीत बसणाºया प्रवाशांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.
महाड आगाराने महाड-मुंबई, महाड-बोरीवली, महाड-ठाणे अशा शिवशाही सुरू केल्या आहेत. यामुळे मुंबई, बोरीवलीकडे जाणाºया प्रवाशांनी शिवशाही बसला प्राधान्य दिले. अल्पावधीतच बस फुल्ल होऊ लागली. महाडमधून जवळपास सहा फेºया शिवशाहीच्या होत आहेत. यामध्ये बोरीवली, मुंबई, पनवेल या फेºयांचा समावेश आहे.
महाडमधून ६.४५ वाजता सुटणारी पहिली शिवशाही आणि यापूर्वीची निमआराम बस गेली अनेक वर्षे खचाखच भरून जात आहे. महाड, माणगाव, रामवाडी आणि पनवेल असा प्रवास करत बस थेट जात असल्याने प्रवाशांनी पसंती दिली. कमी वेळात आरामदायी प्रवास असल्याने अधिकारी, व्यापारी वर्गाने मुंबईकडे जाताना या बसचा पर्याय निवडला. मात्र, गेली काही दिवसांपासून या शिवशाही बस पेण शहरात जात असल्याने वेळ आणि वाहतूककोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतो.
रामवाडीच्या पुढील स्थानक हे पेण आहे. पेण स्थानक हे शहरात आहे. याठिकाणी जाण्यासाठी महामार्गावरून आत प्रवेश करावा लागतो.
रस्त्यालगत दुकाने, छोटे व्यापारी बसत असल्याने तो अरु ंद झाला आहे. त्यातच विक्र म रिक्षा, तीन आसनी रिक्षा, पेण आगाराच्या समोरच ये-जा करीत असल्याने एस.टी.च्या मोठ्या बसेस आणि शिवशाही बसला आगारात प्रवेश करताना अडचणी येतात.
पेण आगारात आधीच अरुंद जागा आहे. आगारातील रस्ताही खराब आहे. ज्या ठिकाणी आगारात प्रवेश केला जातो त्या ठिकाणी रस्ता आणि आगारातील परिसर यामध्ये तफावत असल्याने बसचा मागील भाग आपटला जातो. यामुळे बसचेही नुकसान होत आहे.
घाट मार्गावर असलेली वळणे, उतारावर मागील भाग घासणे यामुळे भोर मार्गे जाणारी शिवशाही बस बंद करण्यात आली आहे. मग पेण आगारातील खराब रस्ता, मागील भाग घासणे, वाहतूककोंडी, अपघाताचा धोका हे संभाव्य प्रश्न समोर असताना पेण आगारात शिवशाही बस नेण्याचा हा प्रयोग कोणी केला असा प्रश्न निर्माण होत आहे.
महाड आगारातून सुटणाºया शिवशाही बसेस या पेणमधील अरुं द आणि गर्दीच्या ठिकाणी जात असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूककोंडीत वेळ वाया जात आहे.
- रितेश कुमार सिंग, प्रवासी
महाड आगारातून सुटणारी पावणेसहा आणि सव्वापाचची शिवशाही बस वगळता अन्य बसेस या पेण आगारात जातात.
- शिवाजी जाधव, सहायक वाहतूक निरीक्षक, महाड