शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

शिवशाहीला वाहतूककोंडीचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 12:07 AM

पेणमध्ये अरुंद रस्ते; फेऱ्यांचा मार्ग बदलल्याने प्रवाशांना त्रास

- सिकंदर अनवारे दासगाव : सिकंदर अनवारे : महाड आगारातून सुटणारी शिवशाही बस यापूर्वी रामवाडी येथे जाऊन थेट पनवेल गाठत होती. मात्र, या फेरीत पेण परिवहन कार्यालयाने बदल करून शिवशाही बस पेण आगारात नेण्याचे फर्मान काढले. यामुळे चालकांना पेणमधील वाहतूककोंडीतून आणि अरुंद रस्त्यातून वाट काढत पेण आगार गाठावे लागत आहे. परिणामी, जलद प्रवासाची अपेक्षा ठेवून शिवशाहीत बसणाºया प्रवाशांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.महाड आगाराने महाड-मुंबई, महाड-बोरीवली, महाड-ठाणे अशा शिवशाही सुरू केल्या आहेत. यामुळे मुंबई, बोरीवलीकडे जाणाºया प्रवाशांनी शिवशाही बसला प्राधान्य दिले. अल्पावधीतच बस फुल्ल होऊ लागली. महाडमधून जवळपास सहा फेºया शिवशाहीच्या होत आहेत. यामध्ये बोरीवली, मुंबई, पनवेल या फेºयांचा समावेश आहे.महाडमधून ६.४५ वाजता सुटणारी पहिली शिवशाही आणि यापूर्वीची निमआराम बस गेली अनेक वर्षे खचाखच भरून जात आहे. महाड, माणगाव, रामवाडी आणि पनवेल असा प्रवास करत बस थेट जात असल्याने प्रवाशांनी पसंती दिली. कमी वेळात आरामदायी प्रवास असल्याने अधिकारी, व्यापारी वर्गाने मुंबईकडे जाताना या बसचा पर्याय निवडला. मात्र, गेली काही दिवसांपासून या शिवशाही बस पेण शहरात जात असल्याने वेळ आणि वाहतूककोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतो.रामवाडीच्या पुढील स्थानक हे पेण आहे. पेण स्थानक हे शहरात आहे. याठिकाणी जाण्यासाठी महामार्गावरून आत प्रवेश करावा लागतो.रस्त्यालगत दुकाने, छोटे व्यापारी बसत असल्याने तो अरु ंद झाला आहे. त्यातच विक्र म रिक्षा, तीन आसनी रिक्षा, पेण आगाराच्या समोरच ये-जा करीत असल्याने एस.टी.च्या मोठ्या बसेस आणि शिवशाही बसला आगारात प्रवेश करताना अडचणी येतात.पेण आगारात आधीच अरुंद जागा आहे. आगारातील रस्ताही खराब आहे. ज्या ठिकाणी आगारात प्रवेश केला जातो त्या ठिकाणी रस्ता आणि आगारातील परिसर यामध्ये तफावत असल्याने बसचा मागील भाग आपटला जातो. यामुळे बसचेही नुकसान होत आहे.घाट मार्गावर असलेली वळणे, उतारावर मागील भाग घासणे यामुळे भोर मार्गे जाणारी शिवशाही बस बंद करण्यात आली आहे. मग पेण आगारातील खराब रस्ता, मागील भाग घासणे, वाहतूककोंडी, अपघाताचा धोका हे संभाव्य प्रश्न समोर असताना पेण आगारात शिवशाही बस नेण्याचा हा प्रयोग कोणी केला असा प्रश्न निर्माण होत आहे.महाड आगारातून सुटणाºया शिवशाही बसेस या पेणमधील अरुं द आणि गर्दीच्या ठिकाणी जात असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूककोंडीत वेळ वाया जात आहे.- रितेश कुमार सिंग, प्रवासीमहाड आगारातून सुटणारी पावणेसहा आणि सव्वापाचची शिवशाही बस वगळता अन्य बसेस या पेण आगारात जातात.- शिवाजी जाधव, सहायक वाहतूक निरीक्षक, महाड

टॅग्स :ShivshahiशिवशाहीRaigadरायगड