शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पाचाड येथे रायगड महोत्सवात अवतरणार शिवशाही

By admin | Published: January 21, 2016 3:56 AM

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे २१ ते २४ जानेवारी या कालावधीत रायगड किल्ला आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे रायगड महोत्सवाचे

महाड : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे २१ ते २४ जानेवारी या कालावधीत रायगड किल्ला आणि किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे रायगड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे गुरु वारी सकाळी ११वा. किल्लेरायगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समारंभाच्या अध्यक्षस्थानी अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत.रायगड महोत्सवात ५० हजारांहून अधिक शिवभक्त हजेरी लावतील असा अंदाज व्यक्त केला जात असून स्थानिक प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झालेली आहे अशी माहिती प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली. महोत्सवाला येणाऱ्या पर्यटकांच्या वाहने पाचाडपासून तीन किमी अंतर अगोदर थांबवण्यात येणार असून तेथून महोत्सवाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी प्रशासनातर्फे पाच बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर मागील विविध कार्यक्रमांच्यावेळी वाहने या मार्गावर वाहतुकीची झालेल्या कोंडीमुळे पर्यटकांचे मोठ्याप्रमाणावर हाल झाले होते. ही वाहतूक कोंडी होवू नये यासाठी ही उपाययोजना केल्याचे सातपुते यांनी सांगितले. रायगडावर व पाचाड येथे जिल्हा प्रशासनातर्फे पाणी, वैद्यकीय सेवा, स्वच्छतागृहे आदि व्यवस्था करण्यात आली असल्याचेही प्रांताधिकारी सातपुते यांनी सांगितले.(वार्ताहर)