नवी मुंबई - ऑक्टोबर अखेरीस आलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा राज्यातील सर्वच भागांतील पिकांना बसला आहे. रायगडमधील जवळपास सर्वच तालुक्यातील भात शेतात पाणी साचल्याने कापणीला आलेले पीक अक्षरश: कुजले आहे. आधीच पुरात भाताची रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यात हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सरकारच्या आदेशानंतर पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे.
कृषी विभागातील अधिकारीही बांधावर जाऊन पंचनामे करीत आहेत. जिल्ह्यातील नुकसानीचे हृदयद्राव्य चित्र आमचे प्रतिनिधी सुनील बुरूमकर, उदय कळस, अभय आपटे, संतोष सापते, राके श खराडे, गिरीश गोरेगावकर, प्रकाश कदम, बाळासाहेब सावर्डे यांनी मांडले आहे.