चांदण्या रात्रींमुळे मुरुडमध्ये मच्छीमारांच्या होड्या किनाऱ्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 12:55 AM2019-12-10T00:55:37+5:302019-12-10T00:55:52+5:30
खोल समुद्रात जाऊनसुद्धा चंद्र, ताऱ्यांच्या प्रखर प्रकाशामुळे मिळत नाही मासळी; कोळी बांधव कामात व्यस्त
- संजय करडे
मुरुड : अवकाळी पाऊस आणि त्यानंतर क्यार आणि महा वादळे झाल्याने वाºयाचा वेग वाढला व ऐन हंगामात होड्या सुमद्रकिनाºयाला लागलेल्या पाहावयास मिळाले. आॅगस्टपासून ते आजतागात समुद्रात कधी वाºयाचे प्रमाण वाढले तर ढगाळ हवामानामुळे कोकण किनाºयावरील समस्त कोळी समाज चिंतेत आहे. शेतकºयांना मदत केली जाते, परंतु समुद्रात मासेमारी करणाºयांना शासनाकडून मदत न मिळाल्यामुळे कोळी समाजाची नाराजी वाढत आहे. परकीय चलन मिळून देणाºया या व्यवसायावर मात्र निसर्गाने सन २०१९ला मोठी अवकृपा केल्याने कर्जाच्या बोज्याखाली हा समाज आहे.
पदवीधर असूनसुद्धा नोकरी मिळत नाही. मासेमारी करूनसुद्धा पुरेसे मासे मिळत नाही. वादळी वाºयामुळे मासे दूरवर निघून गेल्याने मासेमारी ही अल्प प्रमाणात होत आहे. त्यामुळे मोठ्या समस्यांच्या गर्तेत हा समाज सापडला आहे. निसर्गाची अवकृपा व शासनाची कोणतीही मदत मिळत नसल्याने असेल, त्या परिस्थितीत या समाजाला दिवस काढावे लागत आहे. ७ डिसेंबर ते १३ डिसेंबरपर्यंत चांदण्या रात्री असल्यामुळे जाळ्यामध्ये मासे मिळत नाहीत. या दिवसांत मासेमारीला जाऊनसुद्धा भर समुद्रात चंद्राचा व ताºयाचा प्रखर प्रकाश पडत असल्याने मासे जाळ्यात फसत नाहीत, त्यामुळे खोल समुद्रात गेलेल्या होड्या किनाºयावर परत आल्या आहेत. १५ डिसेंबरपासून काळोख्या रात्रीस सुरुवात होईल व किनाºयाला आलेल्या होड्या पुन्हा समुद्रात गेलेल्या पाहावयास मिळणार आहेत. काळोखी रात्र सुरू झाल्यावर मासे जास्त प्रमाणात मिळतात, असे कोळी समाजाने सांगितले.
जाळ्यामध्ये काळोख्या रात्रीत मासे जास्त मिळतात. त्यामुळे खोल समुद्रात असणाºया बोटी परतल्या असून, होड्यांची दुरुस्ती व जाळ्यांची निगा राखण्याच्या कामात कोळी समाज व्यस्त झालेला दिसून येत आहे. या दिवसात होड्यांची रंगरंगोटी, बोटींच्या मशीनची तपासणी करणे, बोटीचे लाकूड तपासणी, बोटीच्या मशीनचे आॅइल बदलणे, पाण्याने बोटी स्वच्छ धुणे, नवीन जाळी तयार करणे, जुनी जाळी फाटली असतील, तर त्या जागी नवीन जाळी तयार करणे, जाळ्यांना ताणून दोन खांबांना बांधून ठेवणे, जाळे कडक उन्हात सुकविणे आदी स्वरूपाची कामे होत असतात.
चांदण्या रात्री सुरू झाल्याने समुद्रात चंद्राचा व चांदण्याचा प्रकाश पडल्याने माशांना जाळी दिसतात, त्यामुळे मासे जाळ्यात फसत नाहीत. अशा वेळी समुद्रात मासे न मिळाल्यामुळे असंख्य बोटी किनाºयावर आलेल्या आहेत. अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे आमची मच्छीमारी संकटात आली आहे. आमचा समाज कर्जबाजारी झाला आहे. यासाठी नवीन सत्तेत बसलेल्या सरकारने कोळी समाजाला आर्थिक मदतीचा हात द्यावा. त्याचप्रमाणे, डिझेल परताव्याची रक्कम सन २०१७ मार्चपासून ते २०१९ पर्यंत प्रकरणे पाठवूनसुद्धा परताव्याची रक्कम बोट मालकांच्या खात्यात जमा झालेली नाही. तरी यासाठीसुद्धा विद्यमान शासनाने निदान परताव्याची रक्कम तरी अदा करावी, अशी आमची मागणी आहे. - मनोहर मकू , उपाध्यक्ष, सागर कन्या मच्छीमार संघटना.