- संदीप जाधवशिवसेना भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते हे सातव्यांदा या मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात असले तरी खासदारकीच्या कारकिर्दीत उल्लेखनीय अशी विकासकामे त्यांच्याकडून झाली नसल्याने त्यांच्याबद्दल महाड विधानसभा मतदारसंघात नाराजी पाहायला मिळत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निसटता पराभव पत्करावा लागलेल्या आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना महाड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार माणिक जगताप यांचा फायदा होणार आहे. आघाडीचा धर्म निभवायचा असल्याचे जगताप यांनी अलिबाग येथे झालेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत जाहीर करण्यात आले.महाड विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था, पाणीटंचाई, आरोग्य सुविधा या मूलभूत सोयीसह महाड-पोलादपूर दोन्ही तालुक्यात विकासकामांच्या नावाने अक्षरश: बोंबाबोंब सुरू आहे. महत्त्वाचे असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपद असतानाही अनंत गीते एकही नवीन उद्योग महाड तालुक्यात आणू शकले नाहीत याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली जात आहे.महाड विधानसभा मतदारसंघात एकूण ३८८ मतदान केंद्रे असून यात महाड तालुक्यात १८७, महाड शहरात २२, पोलादपूर तालुक्यात ६६ तर माणगाव तालुक्यातील तीन जिल्हा परिषद मतदारसंघातील ११३ मतदान केंद्रांंचा समावेश आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तुलनेने कमी असली तरी आघाडीमुळे त्यांना मोठे पाठबळ मिळू शकणार आहे. महाड नगरपरिषदेत आणि पोलादपूर पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात आहे तर महाड पंचायत समितीत शिवसेनेचे वर्चस्व आहे.लोकसभेच्या निवडणुकीनंतर सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असल्याने ही लोकसभा निवडणूक म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना आमदार भरत गोगावले आणि काँग्रेसचे माजी आमदार माणिक जगताप यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. या मतदारसंघात सुनील तटकरे यांच्या तुलनेत अनंत गीते यांचा संपर्क कमी असल्यामुळे गीतेबद्दल नाराजीची भावना आहे.कोकण रेल्वेच्या विविध समस्याकोकण रेल्वेच्या विविध समस्या असून वीर स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्याचे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे.औद्योगिक वसाहतीत तसेच दोन्ही तालुक्यातील परप्रांतीयांना आपल्या मुलुखात रेल्वेने जाण्यासाठी त्यांना चिपळूण अथवा रोहा रेल्वे स्थानकांचा आधार घ्यावा लागत आहे. ही गैरसोय दूर व्हावी यासाठी अनेक आंदोलने आणि निवेदने दिली गेली मात्र वीर येथे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्याकरिता काहीच केले नाही.गतवेळच्या निवडणुकीत केवळ मोदी लाटेवर खासदारपदी सहाव्यांदा विराजमान झालेल्या युतीच्या अनंत गीते यांना या निवडणुकीत मात्र महाड विधानसभा मतदारसंघात कडवे आव्हान असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचाकेंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपद असताना एकही नवीन उद्योग महाड तालुक्यात गीते आणू शकले नाहीत, त्यामुळे महाड पोलादपूर तालुक्यातील बेरोजगारी वाढतच आहे. पदवीधर तरु णांना रोजगार नोकरीच्या संधीच उपलब्ध होत नसल्यामुळे या तरु णांना मुंबई, पुणे आदी शहराकडे रोजगार मिळवण्यासाठी धाव घ्यावी लागत आहे. सत्तेवर येण्यासाठी दोन कोटी तरु णांना रोजगार देण्याचे मोदी सरकारचे आश्वासन आता हवेतच विरले आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगार तरु णांमध्ये गीते आणि सत्ताधारी सरकारविरोधात कमालीची नाराजीची भावना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.गैरसोयींमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची शहराकडे धावमहाड पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था, शैक्षणिक असुविधा, नेहमीची पाणीटंचाई, आरोग्यविषयक सुविधांचा अभाव आदी मूलभूत सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला असल्याने या गैरसोयींना कंटाळून असंख्य कुटुंबे शहराकडे वास्तवास आलेली आहेत.त्यामुळे दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबाची दिवसेंदिवस घट होत असल्याचे विदारक चित्र दुर्दैवाने पाहायला मिळत आहे.या विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत विकासकामांकडे लोकप्रतिनिधींंच्या झालेल्या दुर्लक्षामुळे हे दोन्ही तालुके विकासात्मक दृष्टीने मागे पडल्याची भावना मतदारसंघात आहे. पाणी टंचाईमुळे येथील महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी वणवण भटकं ती करावी लागते, हे चित्र दरवर्षी कायम दिसून येतेमात्र याकडे कोणाचेही लक्ष जात नाही.
महाड, पोलादपूरमध्ये विकासकामांची ओरड; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:49 PM