अलिबाग : ग्रामीण जनतेच्या विकासासाठी आलेला सुमारे ४० लाख रु पयांचा निधी केवळ कागदावर खर्च झाल्याचे दाखवून हडप करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. चौकशी समितीने या प्रकरणात चार तत्कालीन ग्रामसेवकांसह तब्बल १३ ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे; परंतु विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी दोषींवर कारवाईस टाळाटाळ करीत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.जिल्हा परिषदेतील तीनवीरा पाणीपुरवठा, उमठे धरण जल शुद्धीकरण केंद्र, पोषण आहार, शिक्षक बदलीच्या फायलींवर खोट्या सह्या अशी प्रकरणे ताजी आहेत. आता रोहे तालुक्यात शेडसई ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार समोर येत आहे. ग्रामनिधी, वित्त आयोगाच्या निधीचा वापर प्रत्यक्षात कामे न करता सरकारचा निधी हडप केल्याबाबत रोहे तालुक्यातील गोफण येथील सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ कडू यांनी पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे, कडू यांच्या तक्र ारीला ग्रामस्थांनी लेखी जबाब देऊन कामे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये झाली नाहीत. निधीचा गैरवापर झाल्याचे ग्रामस्थांनी लिहून दिल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. या प्रकरणी जबाबदार संबंधित ग्रामसेवकांना रोहा पंचायत समितीने नियुक्त केलेल्या चौकशी अधिकाºयांनी २१ जानेवारी २०१८ व संबंधित ठेकेदारांना ३१ मार्च २०१८ रोजी नोटीस काढली.शेडसईमध्ये ग्रामपंचायत कार्यालय रंगरंगोटी व दुरुस्ती रक्कम रु. ९७ हजार ५०५, रस्ते दुरुस्ती ४ लाख ८३ हजार ५०३ रु पये, कचराकुंडी बांधकाम १ लाख २४ हजार १४० रु पये, शौचालय दुरुस्ती ३ लाख ५० हजार ७३१ रु पये, कमान बांधणे १ लाख ९२ हजार रु पये, आदिवासीवाडी भांडी वाटप ८३ हजार ५१६ रुपये, स्मशानभूमी शेड दुरुस्ती, चौथरा बांधणे १ लाख ६३ हजार रु पये, बस स्टॅण्ड दुरुस्ती ४० हजार, भारत निर्माण योजना एक लाख ६० हजार रु पये, अन्य बिले ३ लाख ५ हजार ३00 रु पये, गोफण सभा मंडप २ लाख रु पये, धोबी घाट आणि शेड ५ लाख, शेडसई अरुंद गल्ली बांधकाम चार लाख, शेडसई रस्ता काँक्रीटीकरण ५ लाख, शेडसई सामाजिक सभागृह आमदार निधी २ लाख ९९ हजार अशा एकूण ३८ लाख ९८ हजार ६९५ इतक्या रकमेची कामे निव्वळ कागदोपत्री झाल्याची तक्रार कडू यांनी केली होती. या कामांमध्ये आमदार निधी, आदिवासी कल्याण निधी, ग्राम निधी यांसारखा निधी वापरण्यात आला. पंचायत राज व्यवस्थेमध्ये निधी प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचत नसेल, तर त्याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे कडू यांनी सांगितले. रघुनाथ कडू यांच्या तक्रारीनुसार ३८ लाख ९८ हजार ६९५ इतक्या रकमेची कामे निव्वळ कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवून ही रक्कम हडप करण्यात आली आहे. कडू यांनी या रकमेमधील कामे ज्या ठिकाणी दर्शविण्यात आली आहेत त्या ठिकाणची छायाचित्रे चौकशी अधिकाºयांकडे सुपूर्द केली. एवढेच नाहीतर, एका पूर्ण वर्षाचे कॅशबुकच गायब असल्याची बाब कडू यांनी उपस्थित केल्याने चौकशी अधिकाºयांनी गंभीर दखल घेतली.- सुमारे ४0 लाख रु पयांच्या भ्रष्टाचाराची तक्रार पंचायत समितीमध्ये केली जाते. या भ्रष्टाचाराची तक्र ार झालेल्या फायली पाहण्यासाठी विस्तार अधिकारी प्रदीप पवार यांना अद्याप वेळ मिळालेला नाही. तक्र ारीची फाइल पाहिलेली नाही, याचा तपास गटविकास अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत असल्याचे रोहे विस्तार अधिकारी प्रदीप पवार यांनी सांगितले.विविध निधीच्या विनियोगात भ्रष्टाचार झाल्याची तक्र ार प्राप्त झाली आहे. या प्रकरणी चार तत्कालीन ग्रामसेवक आणि १३ ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे गटविकास अधिकारी सुनील गायकवाड यांनी सांगितले. तक्र ारीची शहानिशा करण्यासाठी स्पॉट व्हिजिट केलीत का, असे गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले, ग्रामपंचायतीचे दप्तर मागविण्यात आले आहे. चौकशी अधिकारी कार्यालयामध्ये बसून चौकशी अहवाल तयार करणार असतील, तर यातील दोषींना शिक्षा होऊन ग्रामस्थांना न्याय मिळेल?
चार ग्रामसेवकांसह १३ ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 1:54 AM