रायगड : जिल्ह्यात बाप्पाचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. कोरोना महामारीमुळे या वर्षी सर्वच सण अगदी साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. कोरोनाचे सावट गणेशोत्सवावरही पडल्याचे दिसून येते. जिल्ह्यात गणपती बाप्पाचा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.>रायगड जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्तरायगड जिल्ह्यात ६ पोलीस उपविभागीय अधिकारी, ६ पोलीस निरीक्षक, १३ सहायक पोलीस>निरीक्षक/ उपनिरीक्षक, २१७ पोलीस कर्मचारी, ९ मदत केंद्रे, २० वॉकीटॉकी, ९ क्रेन,९ रुग्णवाहिका त्याचप्रमाणे २७ पोलीस ठाण्यांचा बंदोबस्त स्थानिक ठिकाणी राहणार आहे. अशी चोख व्यवस्था पोलीस प्रशासनाने के ली आहे.विसर्जन स्थळेकर्जत, नेरळ, माथेरान, खालापूर, खोपोली, रसायनी, पेण, वडखळ, दादर सागरी, पोयनाड, अलिबाग, मांडवा, रेवदंडा, मुरूड, रोहा, नागोठणे, पाली, कोलाड, माणगाव, गोरेगाव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, दिघी, महाड शहर, महाड तालुका, महाड एमआयडीसी, पोलादपूर अशा २८ ठिकाणी विसर्जनाची सुविधा.>सर्वांनी शांततेनेउत्सव साजरा करावाजिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाचा उत्सव साजरा करताना नागरिकांनी नाका-तोंडाला मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे. घरातील लहान मुले आणि वयोवृद्धांची काळजी घ्यावी. सर्वांनी शांततेने उत्सव साजरा करावा.- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड>मूर्तींची होणार स्थापनारायगड जिल्ह्यातील नागरिक उत्सवप्रिय आहेत. पेण तालुक्यातून लाखोंच्या संख्येने जगाच्या कानाकोपऱ्यात गणेशमूर्ती रवाना होतात. पेणमध्ये जसे गणेशमूर्ती निर्मितीचे कारखाने आहेत, तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये गणेशमूर्ती तयार केल्या जातात. तब्बल १,००,५२६ गणेशमूर्तींची २२ आॅगस्ट गणेश चतुर्थीच्या दिवशी प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.महापालिका,विविध मंडळे,गृहनिर्माण संस्था,लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.न्यायालयाचे आदेश, महापालिका तसेच स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत व मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत.श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट आणि घरगुती गणपतीसाठी दोन फुटांची असावी.शक्यतो पारंपरिक मूर्र्तींऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्र्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. ते शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.उत्सवाकरिता देणगी-वर्गणी स्वेच्छेने दिल्यास तिचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, असे पाहावे. आरोग्यविषयक, सामाजिक जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक.सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे आणि कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजार व त्याचे प्रतिबंधक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, तसेच ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा आॅनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे, तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाºया भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग) तसेच स्वच्छतेचे नियम पाळले जातील, याकडे लक्ष द्यावे.श्रींची आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. (राज्य शासनाच्या सूचना)
बाप्पाच्या आगमनानं आनंदाचा होणार ‘श्रीगणेशा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 11:48 PM