शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
2
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
3
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
4
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
5
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
6
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
7
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
8
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
9
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
10
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
11
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
12
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
13
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
15
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
16
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
17
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
18
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
19
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
20
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा

Cyclone Nisarga: श्रीवर्धन, म्हसळा महिनाभर अंधारात; निसर्ग चक्रीवादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 03:22 IST

वीजपुरवठा पूर्ववत होत नसल्याने नाराजी

दिघी : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याला फटका बसला. त्यामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली. यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र प्रशासनाने जलदगतीने कामाला सुरुवात करून वादळामुळे पडलेली झाडे बाजूला करून रस्ते वाहतूक सुरू के ली. तसेच जिल्ह्यातील वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले.

निसर्ग चक्रीवादळामुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत वीजपुरवठा सुरू झाला; मात्र श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यात अद्यापही अंधारच आहे. गावोगावी स्थनिक ग्रामस्थ स्वत:हून पुढे येत विजेचे खांब उभे करण्यासाठी श्रमदान करीत आहेत. महावितरण व कंत्राटदार यांच्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांना साथ देण्याचे काम ग्रामस्थ करीत आहेत.

निसर्ग चक्रीवादळामुळे श्रीवर्धन तालुक्यातील वीजपुरवठा करणाºया वाहिन्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील इतरत्र वीजपुरवठा सुरळीत झाला असताना श्रीवर्धन व म्हसळा तालुका मात्र एक महिना उलटूनही अंधारात आहे. याबाबत येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.प्रशासन अपयशी३ जूनला आलेल्या निसर्ग चक्रीवादळला एक महिना पूर्ण होत आहे. एक महिन्यानंतरदेखील वीजपुरवठा सुरू होत नाही हे प्रशासनाचे अपयश असल्याचे दिसते. ग्रामीण भाग आजही अंधारात आहे.

गोंडघर - बोर्लीपंचतन रस्त्यावरील भूमिगत वीजवहिनीमध्ये बिघाड झाल्याने सुरू झालेला वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्याची दुरुस्ती सुरू असून लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल. - महेंद्र वाघपैंजन, महावितरण उपअभियंता श्रीवर्धन

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळelectricityवीज