घनकचरा व्यवस्थापनात घोळ, श्रीवर्धनमध्ये नागरिकांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:45 AM2018-06-12T04:45:22+5:302018-06-12T04:45:22+5:30

श्रीवर्धन नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा एकदा पेटला आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती होत नसताना ठेकेदार कंपनीला लाखो रु पयांचे बिल अदा करण्यात आले आहे.

Shrivardhan  Misleading of the people News | घनकचरा व्यवस्थापनात घोळ, श्रीवर्धनमध्ये नागरिकांची दिशाभूल

घनकचरा व्यवस्थापनात घोळ, श्रीवर्धनमध्ये नागरिकांची दिशाभूल

Next

- आविष्कार देसाई
अलिबाग : श्रीवर्धन नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा एकदा पेटला आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती होत नसताना ठेकेदार कंपनीला लाखो रु पयांचे बिल अदा करण्यात आले आहे. सत्ताधारी आणि नगरपालिका प्रशासन नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
श्रीवर्धनमध्ये शहरीकरण वाढत असल्याने घनकचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी नगर पालिका प्रशासनामार्फत तेथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात आला. २०१४ मध्ये तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. कोकणातील पहिला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असल्याने चांगलीच वाहवा झाली. मात्र २०१४ पासून प्रकल्पातून खतनिर्मिती झाली नसल्याचा आरोप श्रीवर्धनकर यांनी निवेदनात केला आहे. जुन्या यंत्रसामग्रीला रंगरंगोटी करून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली
आहे.
शेड, विहीर, कामगार वसतिगृह, संरक्षक भिंतीचे काम पूर्ण केल्यानंतर या प्रकल्पाचे पुन्हा उद्घाटन विद्यमान नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांनी ३ जुलै २०१७ रोजी केले.
खतनिर्मिती करण्यासाठी सद्गुरु बहुउद्देशीय संस्थेला तब्बल ६४ लाख ८० हजार रु पयांचा ठेका मंजूर करण्यात आला. अद्यापही प्रकल्पातून खतनिर्मिती झालेली नाही तरी ठेकेदार संस्थेला १३ लाख रु पयांचे बिल अदा करण्यात आल्याकडे श्रीवर्धनकर यांनी लक्ष वेधले.
शहरामधील कचरा गेल्या वर्षभरापासून जाळण्याचा प्रकारही केला जात आहे. यातील गंभीर बाब म्हणजे शहरातील कचरा शहराबाहेरील खासगी जागेमध्ये टाकून त्यावर मातीचा भराव करण्यात येतो. याबाबत विचारणा केली असता, निकामी कचरा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनतेच्या पैशाची लूट करणाºयांवर तातडीने कारवाई करु न फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा शिवसेना जनआंदोलन उभारेल असा इशारा श्रीवर्धन नगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम श्रीवर्धनकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी निवेदन स्वीकारले.

ज्या कचºयापासून खतनिर्मिती होऊ शकत नाही तोच कचरा डंप केला जातोय. त्याचप्रमाणे कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी तो पेटवलाही जात नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातून खतनिर्मिती केली जाते त्याचा रेकॉर्डही आहे.
- अर्चना दिवे, मुख्याधिकारी,
श्रीवर्धन नगरपालिका

Web Title: Shrivardhan  Misleading of the people News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.