श्रीवर्धन : तालुक्यातील तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखणी बंद आंदोलन केले. यामुळे तहसील कार्यालयात कामासाठी तालुक्यांतून आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन कराव लागला. या लेखणी बंद आंदोलनात श्रीवर्धन प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी सामील झाले होते. प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयातील आवल्ल कारकून ६, लिपिक १५, शिपाई ८ असे एकूण २९ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.महाडमध्ये लेखणी बंद आंदोलनमहाड : प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी प्रांताधिकारी व तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. सोमवारी ११ एप्रिलला सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपले कामकाज केले. टप्प्याटप्प्याने हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी मुंढेकर यांनी दिली. कर्जतमध्ये आंदोलनाला प्रतिसादकर्जत : नायब तहसीलदार संवर्गातील सर्व पदे पदोन्नतीने भरण्यात यावीत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नायब तहसीलदार अशा विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी शासन दरबारी मागणी केली आहे. परंतु शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप करीत शासनाचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखा रायगडच्यावतीने मंगळवारी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. मुरुड महसूल कर्मचारी आंदोलनात सहभागीमुरुड : मुरुड तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार, नायब तहसीलदार वगळता मंगळवारी (१२ एप्रिल) २५ महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनात भाग घेतला. एरव्ही तहसील कचेरीसमोर दिसणारी गर्दी मंगळवारी नव्हती. तथापि तालुक्यातून लांबून आलेल्या नागरिकांची गैरसोय टाळावी म्हणून अॅफिडेव्हिट तसेच चॅप्टर केसेसची कामे मार्गी लावायचे महसूल निवासी तहसीलदार दिलीप यादव यांनी सांगितले.
श्रीवर्धन महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन
By admin | Published: April 13, 2016 1:29 AM