- अरूण जंगमम्हसळा - श्रीवर्धन एसटी आगारातील वाहतूक निरीक्षकांच्या मनमानी कारभाराचा त्रास खेड्यापाड्यातील सर्वसामान्य जनतेस होत आहे. एसटी आगारातील चालक व वाहक कर्मचारी कामगिरीचे आरेखन करणाऱ्या उदय हाटे व पवार या वाहतूक निरीक्षकांमुळे ग्रामीण भागातील एसटी वाहतूक विस्कळीत झाली आहे .श्रीवर्धन एसटी डेपो हा ग्रामीण व शहरी वाहतुकीसाठी ओळखला जातो. आगारातून मुंबई,नालासोपारा, बोरिवली, पुणे ही लांब पल्ल्याची वाहतूक चालते. श्रीवर्धन तालुक्याची भौगोलिक रचना लक्षात घेता ग्रामीण वाहतूक अतिशय अवघड आहे. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील गावे वाहतुकीसाठी एसटीवरती अवलंबून आहेत.हरिहरेश्वर, दिघी व म्हसळा या मुख्य रस्त्याव्यतिरिक्त सगळीकडे एसटीचीच वाहतूक चालते त्यापोटी एसटी महामंडळाला चांगले व नियमित उत्पन्न मिळते. आता गर्दीचा हंगाम चालू आहे त्यामुळे जादा वाहतूक श्रीवर्धन आगारातून सुरू आहे ही आनंदाची बाब आहे . ग्रामीण भागातील लोकांना वाहतुकीसाठी एसटी सोडून दुसरा पर्याय नाही त्याचा गैरफायदा एसटी अधिकारी घेत आहेत.चालक व वाहकांना कामगिरी लावणारे वाहतूक निरीक्षक उदय हाटे यांनी कुठलाही विचार न करता तीन दिवसांपासून नानवेल वस्तीची मुक्कामाची बस बंद केली आहे. त्यामुळे नानवेल, सर्वा, आदगाव, वेळास, धनगरमलई, बोर्ला, नागलोली या भागातील प्रवाशांचे जास्त हाल होत आहेत त्यांना वाहतुकीचे दुसरे साधन उपलब्ध नाही.तसेच रोहिणी, तुरबाडी, काळसुरी, वारळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवासी खाजगी साधनांचा वापर करत आहेत.एसटी आगारात चालक व वाहक कामगिरी लावणाºया वाहतूक निरीक्षकांच्या कार्यकर्तृत्वाविषयी कर्मचाºयात अनेक किस्से सांगितले जातात.खेडेगावातील वाहतूक सेवा बंद करण्यापाठी वाहतूक निरीक्षकांचा हेतू स्पष्ट झालेला नाही.आगारप्रमुखांनी लग्नसराईच्या हंगामासाठी या गाड्या बंद केल्या आहेत, परंतु श्रीवर्धन आगारास भासत असलेली गाड्यांची कमतरता दूर करु न लवकरात लवकर सदरच्या लोकल मार्गावरील बसेस पूर्ववत चालू करण्यात येतील.- अनघा बारटक्के,विभागीय नियंत्रकसदर मार्गावर आगारातून गाड्या येत नसल्याने आम्हास बस आली नाही किंवा तात्पुरती बंद आहे असा शेरा मारु न ठेवतो.- जनार्दन वासकर,म्हसळा वाहतूक नियंत्रकएसटीच्या वाहतूक अधिकाºयांच्या मनमानी कारभाराविषयी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे तक्र ार दाखल करणार आहे. ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत झाली पाहिजे.- श्याम भोकरे, शिवसेना पदाधिकारीमी अनेक वर्षांपासून एसटीचा नियमित प्रवासी आहे, परंतु श्रीवर्धन डेपोतील वाहतूक अधिकाºयांनी तीन दिवसांपासून नानवेल वस्तीची बस सोडली नाही त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या .आता एसटीवर अवलंबून राहणे चुकीचे वाटत आहे- गजानन विलनकर, प्रवासी आदगावलग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने श्रीवर्धन आगारातील दहा ते पंधरा बसेस लग्नासाठी बुकिंग होत असल्याने द्याव्या लागत आहेत. परिणामी बसेसची कमतरता भासत आहे. या सर्वांवर पर्याय म्हणून काही दिवसांकरिता या मार्गावरील गाड्या बंद केल्या आहेत.- रेश्मा गाडेकर, आगारप्रमुखश्रीवर्धन आगार