श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार - तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:12 AM2020-06-21T00:12:38+5:302020-06-21T00:13:08+5:30

श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देऊ, असे खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा व पत्रकार परिषदेत सांगितले.

Shrivardhan's past glory will be regained - Tatkare | श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार - तटकरे

श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार - तटकरे

Next

संतोष सापते 
श्रीवर्धन : चक्रीवादळाने श्रीवर्धन उद्ध्वस्त केले आहे. शेतकरी, सर्वसामान्य व्यक्ती त्रासला आहे. मात्र, त्याने नाउमेद होऊ नये. आम्ही शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार श्रीवर्धनचे गतवैभव पुन्हा एकदा मिळवून देऊ, असे खासदार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा व पत्रकार परिषदेत सांगितले.
श्रीवर्धनमधील बागायतदार, सर्वसामान्य शेतकरी, मजूर सर्व घटकांना चक्रीवादळाने बाधित केले आहे. तालुक्यातील सर्व घरांचे नुकसान झाले आहे. अगोदरच्या सरकारने विविध नैसर्गिक आपत्तीत दिलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत विद्यमान सरकारने जनतेला दिली आहे. आज मी व माझे संपूर्ण कुटुंब जनतेच्या दु:खात सहभागी आहोत. पालकमंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे व मी संपूर्ण रायगड जिल्ह्यात फिरून जनतेच्या समस्या जाणून घेत आहोत.
शेतकरी व बागायतदार यांच्यासाठी जास्तीतजास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्वंकष प्रयत्न केले आहेत. सामान्य माणसाच्या घरासाठी दीड लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अगोदर ही रक्कम अतिशय नगण्य स्वरूपात होती. चक्रीवादळात अन्नधान्य, कपडे व इतर वस्तू यांच्याही नुकसानभरपाईची तरतूद सरकारने केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य व उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत व मी यांच्यात झालेल्या बैठकीत कोकणासाठी तत्काळ मदत देण्याचे ठरविले गेले. त्यानुसार आपल्या श्रीवर्धनसाठी अपेक्षित असलेली रक्कम ४५ कोटी आपण उपलब्ध करून घेतली आहे. कोकणच्या जनतेच्या पाठीशी विद्यमान सरकार ठामपणे उभे आहे. शेतकरी वर्गासाठी मोफत बियाणे आपण देऊ व शेतीसाठी लागणाऱ्या विविध रोजगार हमी योजना आपण आपल्या भागात आणणार आहोत. कोल्हापूर व सांगलीला पूर आल्यावर त्यांनी किती मदत केली, हे सर्वांनी अनुभवले आहे. मात्र, विद्यमान सरकारने तत्काळ मदत दिली आहे. आम्ही आपत्ती व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात यशस्वी झालो आहोत. आपत्तीपूर्व, आपत्तीच्या दरम्यान व आपत्तीपश्चात श्रीवर्धन तालुका प्रशासनाने अतिशय चांगले काम केले. त्यामुळे जीवितहानी टाळण्यात आपण यशस्वी झालो आहोत. भरडखोल, दिघी, हरिहरेश्वर व श्रीवर्धनमधील जीवना सर्व ठिकाणी तालुका प्रशासनाने सुंदर नियोजन केले. स्थलांतरित निर्वासित लोकांना व्यवस्थित व चांगले अन्न पोहोचविले आहे.
>पर्यटन विकास हाच ध्यास
श्रीवर्धनचा पर्यटन विकास हा माझा ध्यास आहे. आगामी काळात विविध योजना करून आपण पर्यटन पूर्ववत करूच. कोविडमध्ये पर्यटन व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला आहे. मात्र, पर्यटनास थोड्या दिवसांत उभारी देऊ. त्यासाठी विविध योजना आपण आपल्या भागात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शून्य व्याजदराने पर्यटक व्यावसायिकांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

Web Title: Shrivardhan's past glory will be regained - Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.