शुभमचा रिस-गोवा सायकल प्रवास
By admin | Published: January 28, 2017 02:53 AM2017-01-28T02:53:40+5:302017-01-28T02:53:40+5:30
रसायनी रिस येथील एचओसी पिल्लई इंटरनॅशनल स्कूलच्या डिप्लोमा शाखेत शिकत असलेल्या शुभम शिंदे व अक्षय गायकवाड
मोहोपाडा : रसायनी रिस येथील एचओसी पिल्लई इंटरनॅशनल स्कूलच्या डिप्लोमा शाखेत शिकत असलेल्या शुभम शिंदे व अक्षय गायकवाड या दोघांनी पर्यावरण स्वच्छतेचा संदेश देत १४ जानेवारी रोजी सायकलवरून अलिबाग, मुरुड सागरी किनाऱ्यामार्गे गोव्यापर्यंत कोल्हापूर, पुणे मार्गे रसायनी असा १२६० किमीची सायकल भ्रमंती केली.
यावेळी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांना भेटी देवून किल्ल्यांचे वैभव परत आणण्याच्या दृष्टीने किल्ल्यात स्वच्छता राखण्याबाबत संदेश देवून स्वच्छता करण्याची गरज असल्याचे सांगत जनजागृती केली.असल्याचे शुभमने सांगितले. शुभमने हा प्रवास सायकलवरून १२ दिवसांत पार करून तो आपल्या रसायनीतील गणेशनगर येथे २६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पोहचला. यावेळी शालेय मुख्याध्यापक, सर्वपक्षीय पदाधिकारी, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश गायकवाड आदींनी शुभमचे कौतुक केले.