उरणमध्ये दुर्मिळ ' लेसर कूकू ' चे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2023 06:33 PM2023-12-09T18:33:55+5:302023-12-09T18:34:19+5:30
पक्षीप्रेमी सुखावला आहे.
मधुकर ठाकूर, उरण : उरण परिसरातील जंगलात अल्प कालावधीसाठी परदेशातुन स्थलांतरित होणाऱ्या दुर्मिळ छोट्या कोकिळेचे (लेसर कूकू) दर्शन झाल्याने येथील पक्षीप्रेमी सुखावला आहे.
छोटा कोकीळ पावसाळा संपताच काही कोकीळ प्रजाती भारतभर स्थलांतर करतात.त्यातील अल्प कालावधीसाठी स्थलांतर करणारा छोटा कोकीळ हा पक्षी आहे.छोटा कोकिळ हा पक्षी बांगलादेश, श्रीलंका, भुतान,हॉगकॉग, चीन, पाकिस्तान, रशिया, सियाचीन, नेपाळ, थायलंड, सोमालिया, जपान, केनिया,नार्थ-साऊथ कोरिया, दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, झांबिया, झिम्बाब्वे, सोमालिया आदी देशांमध्ये आढळून येतात.परदेशातुन हा पक्षी स्थलांतर करून दक्षिण भारतात येतो. या पक्षाचे प्रजनन हिमालयात व उत्तर- पूर्व भारतात होते. वसंत ऋतूच्या आगमनाचे दर्शक असणाऱ्या या पक्षाचे नुकतेच उरणच्या जंगलात दर्शन झाले असल्याची माहिती पक्षीप्रेमी विवेक केणी यांनी दिली.Lesser Cuckoo किंवा (Cuculus poliocephalus) या इंग्रजी नावानेही छोटा कोकीळ या दुर्मिळ पक्षाला ओळखले जाते. याआधीही कर्नाळा पक्षी अभयारण्यात हा छोटा कोकीळ दृष्टीस पडला होता.
रायगड जिल्ह्यात या पक्षाच्या दिसण्याच्या फक्त १० -१२ नोंदी या पूर्वीही काही पक्षीनिरिक्षकांनी नोंदविल्या आहेत. पण या पक्षाचे दर्शन फारच दुर्लभ असते.अगदी क्वचितच दिसणारे हा पक्षी पाहणे फारच रोमांचक अनुभव असल्याचे पक्षी प्रेमी केणी यांनी सांगितले.