मासळीचे प्रमाण घटल्याने महत्त्वाचे मासे झाले दुर्मीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 12:42 AM2020-12-24T00:42:31+5:302020-12-24T00:42:48+5:30

Murud : २०२० हे वर्ष मच्छीमारांना खूप संकटाचे गेले असून, अवकाळी पाऊस व निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका सहन करावा लागल्याने, मोठ्या आर्थिक संकटात कोळी समाज सापडला आहे.

Significant fish became scarce due to declining fish stocks | मासळीचे प्रमाण घटल्याने महत्त्वाचे मासे झाले दुर्मीळ

मासळीचे प्रमाण घटल्याने महत्त्वाचे मासे झाले दुर्मीळ

Next

मुरुड : संपूर्ण कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे, तर रायगड जिल्ह्याला २४० किलोमीटरचा समुद्रकिनारा असून, किनाऱ्यावर राहणाऱ्या कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारीवर अवलंबून आहे. देशाला परकीय चलन मिळवून देऊन आंतरराष्ट्रीय बाजारात भारताची पत सुधारण्याचे महत्त्वपूर्ण कामगिरी मच्छीमार करतात. मात्र, हे मच्छीमार मासळीचे प्रमाण घटल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.
२०२० हे वर्ष मच्छीमारांना खूप संकटाचे गेले असून, अवकाळी पाऊस व निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका सहन करावा लागल्याने, मोठ्या आर्थिक संकटात कोळी समाज सापडला आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीर्वर्धन, मुरुड, उरण, अलिबाग या महत्त्वाच्या तालुक्यात मच्छीमारांचा सर्वात मोठा व्यवसाय चालतो. येथील सर्व मासळी जिल्ह्याच्या अन्य भागात पोहोचून मासळीची कमतरता दूर केली जाते. रायगड जिल्हा हा पर्यटन क्षेत्र असल्याने येथे वर्षाला लाखो पर्यटक भेट देत असतात. अशा वेळी पर्यटकांना आवडणारी मासळी येथे मुबलक प्रमाणात मिळत असते, परंतु गेल्या काही दिवसापासून मासळी बाजारात मासळीचे प्रमाण घटल्याने मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पापलेट, घोळ, रावस, सुरमय, हलवा, फिलसा ही मासळी दिसेनासी झाली आहे. फक्त तुरळक मासळीच बाजारात येत असल्याने पर्यटक व स्थानिक नागरिक यांची हिरमोड होताना दिसत आहे.
समुद्रात जेली फिश जास्त सापडू लागल्याने मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाली आहे. अचानकपणे गेल्या काही दिवसांपासून मासळीचे प्रमाण घटले आहे. 

खोल समुद्रातही मासळी नाही 
या परिस्थितीबाबत काही मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलो, तरी पुरेशी मासळी मिळत नाही. मासळीसाठी टाकलेल्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात जेली फिश मिळत आहे, डिझेलचा खर्च परवडत नाही, त्यामुळे आमच्यावर कर्जाचा बोजा वाढत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसापासून मासळी मिळेनाशी झाली आहे. ही परिस्थती रायगड जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आहे. हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. जेली फिश मोठ्या प्रमाणात खोल समुद्रात सापडत आहे. त्यामुळेही मासळी खूप दूर निघून गेली आहे. सध्या डिझेलचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे खोल समुद्रात मच्छीमारी करणे आता मच्छीमारांना खूप कठीण जात आहे. वाढत्या डिझेलच्या दरामुळे लहान व माध्यम स्वरूपाच्या बोटींना हा खर्च परवडेनासा झाला आहे.
- मनोहर बैले, उपाध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छीमार संघ

Web Title: Significant fish became scarce due to declining fish stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड