पोलिसांविरोधात मूक मोर्चा शांततेत , रोह्यात बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 02:20 AM2017-10-05T02:20:16+5:302017-10-05T02:20:47+5:30

रायगड जिल्ह्यातील रोहा शहराचे आराध्य दैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या वेळी पोलिसांनी दडपशाही व दंडेलशाही करून भक्तांच्या भावना दुखावल्या

In silence of silence against police, in spite of the resignation of citizens, | पोलिसांविरोधात मूक मोर्चा शांततेत , रोह्यात बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलिसांविरोधात मूक मोर्चा शांततेत , रोह्यात बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

रोहा : रायगड जिल्ह्यातील रोहा शहराचे आराध्य दैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या वेळी पोलिसांनी दडपशाही व दंडेलशाही करून भक्तांच्या भावना दुखावल्या. पोलिसांच्या या दंडेलशाहीविरोधात रोहेकरांनी निषेध व्यक्त करण्यासाठी मूक मोर्चा काढून रोहा बंदची हाक दिली होती. पोलिसांच्या घटनेच्या निषेधाचे निवेदन रोहा प्रांताधिकाºयांना दिले असून, या मोर्चाला रोहेकरांनी उत्स्फूर्त पाठिंबा देऊन शहरात १०० टक्के बंद पाळला.
रोहा शहराचे आराध्य दैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याला १५६ वर्षांची परंपरा आहे. धावीर महाराजांचा उत्सव व पालखी सोहळा रोहेकरांसाठी अभिमानास्पद आहे. पालखी सोहळ्यामध्ये हिंदू-मुस्लीम बांधव एकोप्याने सामील होतात. रोहेकरांबरोबर राज्यातून भक्तगण या पालखी सोहळ्याला रोह्यात येत असतात. श्री धावीर महाराजांची पालखी निघताना पोलीस मानवंदना देण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा आजही सुरू आहे.
१ आॅक्टोबर रोजी धावीर महाराजांचा पालखी सोहळा सुरू असताना पारंपरिक खालू बाजा वाद्य वाजवले जात होते. मात्र, १० नंतर कोणतेही वाद्य वाजवणे बंधनकारक आहे, या मुद्द्यावर रोहा पोलिसांनी गावात ठिकठिकाणी विवादाला
सुरु वात केली. लोकांना नाहक धमकावत पोलीस पिंजरा व्हॅनला पाचारण केले. आपली दंडेलशाही वापरून पारंपरिक वाद्य वाजविण्यासही बंदी घातली. यावरून भक्तांच्या भावना दुखावल्या असून, नागरिकांमध्ये पोलिसांविरोधात संतप्त वातावरण निर्माण झाले. १५६ वर्षांमध्ये पालखी सोहळ्यात अशी घटना घडली नव्हती. पोलिसांनी पालखी सोहळ्यात केलेल्या अडवणुकीबाबत गावातील वातावरण दूषित झाले असून, या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी ४ आॅक्टोबरला मूक मोर्चाचे आयोजन केले होते. सकाळी ११ वाजता, या मूक मोर्चाला राम मारु ती मंदिर येथून सुरुवात झाली. पोलिसांच्या विरोधातील निषेधाचे फलक घेऊन रोहेकर मोठ्या संख्येने सामील झाले.

आठ हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग
मूक मोर्चाने रोहा शहरातील रस्ते नागरिकांनी फुलले होते. मारु ती नाक्यापासून निघालेला मोर्चा तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. मोर्चात सुमारे आठ हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. साधारण एक किलोमीटर लांबीची मोर्चाची रांग होती. तहसीलदार कार्यालयाजवळ पोहोचलेल्या मोर्चाचे दुसरे टोक रोहा बाजारपेठेत होते. मोर्चा तहसीलदार कार्यालय येथे आल्यावर ग्रामस्थांच्या वतीने युवती उमा कोर्लेकर आणि मकरंद बरटक्के यांनी मोर्चाला संबोधित करीत नागरिकांच्या संतप्त भावनांना वाट मोकळी केली. महिलांनी प्रांताधिकाºयांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला. हा मोर्चा शांततेत निघाला असून, कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.

पोलिसांचाच बंदोबस्त
श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यात पोलिसांनी दंडेलशाही करून लोकांच्या भावना दुखावल्या. याबाबत रोहेकरांनी मूक मोर्चा काढला होता. पोलिसांविरोधात मोर्चा असूनही या मोर्चाला पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: In silence of silence against police, in spite of the resignation of citizens,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.