‘सर...आम्ही आपले आभारी आहोत’...विद्यार्थ्यांची अनोखी कल्पकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 05:12 AM2018-10-04T05:12:44+5:302018-10-04T05:13:04+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृह : वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आभारपत्राने भारावले जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी
जयंत धुळप
अलिबाग : सोमवारी लोकशाही दिनाच्या दिवशी सकाळी गोंधळपाडा येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी पुन्हा एकदा थेट रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी कार्यालयात पोहोचले आणि सर्व विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्यांचे ‘सर...आम्ही आपले आभारी आहोत’ असे अनोखे आभारपत्र जिल्हाधिकाºयांच्या हाती दिले आणि काही क्षण जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी भारावून गेले. यावेळी लोकशाही दिनास उपस्थित नागरिक देखील सुखावून गेले.
मी देखील वसतिगृहात राहिलो आहे. वसतिगृहात राहून अभ्यास केला आहे. वसतिगृहात धमाल-मस्ती करायची पण त्याच बरोबर अभ्यास करुन मोठे व्हायचे असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी या सर्व मुलांना केले. अभ्यास करुन मोठे होणार अशा विश्वास जिल्हाधिकाºयांना देवून सर्व मुलांनी त्यांचा निरोप घेतला.
जिल्हाधिकाºयांचे आभार मानणे गरजेचे
च्डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील मुलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ आणि मारहाण करणाºया वसतिगृहाच्या महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांना चोवीस तासांच्या आत बदलून त्यांच्या जागी अनिल मोरे यांची नियुक्ती करुन गेल्या चार वर्षांपासूनच्या त्रासातून या सर्व मुलांची जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी मुक्तता केल्यावर या मुलांनी रविवारी आनंदोत्सव साजरा केला. परंतु त्याच वेळी आपण जिल्हाधिकाºयांचे आभार मानणे गरजेचे असल्याचे त्यांच्या डोक्यात आले.
कल्पकतेने आगळ्या आभारपत्राची निर्मिती
च्रविवारी वसतिगृहाचा विद्यार्थी प्रतिनिधी लक्ष्मण केंडे याने अलिबागमध्ये येवून कार्डबोर्ड, स्केटपेन्स आदि सामग्री खरेदी केली. रात्री वसतिगृहात बसून लक्ष्मण केंडे आणि त्याचे सहकारी विद्यार्थी सुनील बोडेकर, जयेश झोरे, राजू लोभी, गजानन पारधी, अशोक पिंगळा, हौशीराम आढळ आणि जयवंत लोभी यांनी डोके चालवून कल्पकतेने ‘सर...आम्ही आपले आभारी आहोत’ या आगळ््या आभार पत्राची निर्मिती केली आणि सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांना आदरपूर्व देवून उपस्थितांना अनोखा धक्काच दिला. यावेळी सहाय्यक समाज कल्याण अधिकारी रविकिरण पाटील, वसतिगृहाचे नूतन गृहपाल अनिल मोरे हे देखील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना गवसला आत्मविश्वास
च्जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या सत्वर निर्णयाच्या कार्यवाहीतून वसतिगृहातील या मुलांची केवळ त्रासातून मुक्ती झाली असे नाही तर तरुण पिढीमध्ये प्रशासना बाबत मोठी सकारात्मकता निर्माण झाली आहे. त्याच वेळी योग्य वेळी अचूक निर्णय घेवून संभाव्य अशांतता निर्माण होणारच नाही, परिस्थिती चिघळणारच नाही याची दक्षता कशी घ्यावी याचा आदर्श वस्तुपाठ देखील निमित्ताने प्रशासनास घालून देण्यात डॉ.सूर्यवंशी यशस्वी झाले आहे. आमचे प्रश्न आम्ही स्वत: सोडवू शकतो असा आत्मविश्वास या सर्व विद्यार्थ्यांना गवसला हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.