कनपट्टीला बसून कामे करून घ्या

By admin | Published: October 13, 2016 04:00 AM2016-10-13T04:00:34+5:302016-10-13T04:00:34+5:30

रस्त्यावर खड्डे पडले म्हणण्यापेक्षा सरकारच्या कनपट्टीला बसून रस्त्यांची काम करून घ्या, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या

Sit back and forth in the work of the computer | कनपट्टीला बसून कामे करून घ्या

कनपट्टीला बसून कामे करून घ्या

Next

रोहा : रस्त्यावर खड्डे पडले म्हणण्यापेक्षा सरकारच्या कनपट्टीला बसून रस्त्यांची काम करून घ्या, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या आमदार, खासदार व मंत्र्यांना दिले. आर्थिक निकषांनुसार आरक्षण देण्याची शिवसेना प्रमुखांची मागणी तेव्हा मानली असती तर आज ही वेळ आली नसती. त्यामुळे आता जातीवरच आरक्षण द्यावे लागेल तेही इतर कुणाचेही आरक्षण न हलवता असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या वतीने ५००० विद्यार्थ्यांना टॅब वितरण व फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रोहा येथील भव्य मेळाव्यात करण्यात आले. त्या प्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री अनंत गीते, संपर्क प्रमुख आदेश बांदेकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार मनोहर भोईर, आमदार अनिल परब, जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई, रवी मुंढे, किशोर जैन, संजय देशमुख, भेलचे अध्यक्ष अतुल सोबती आदि उपस्थित होते.
विरोधकांचा उल्लेख न करता त्यांना आगामी निवडणुकीत नेस्तनाबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सिंचन घोटाळ्याचे पाणी यांच्या आता नाकातोंडात गेले आहे. जाऊ तिथे खाऊ वाल्यांना स्वच्छ रोहा योजनेत या निवडणुकीत साफ करून टाका असे सांगत आता लोकसभेत हारले ते आता नगरपालिकेला जरी उभे राहिले तरी पडतील असा टोला लावला. टॅबमध्ये एक पैशाचा घोटाळा दिसला तरी मी जबाबदार आहे असे ठणकावले.
डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहासमोरील पटांगणात झालेल्या या सभेस दहा हजाराहून अधिक शिवसैनिक उपस्थित होते. मेडिकल क्लिनिकचे लोकार्पण झाल्यावर धामणसई व भालगाव शाळेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात टॅब वितरण करण्यात आले. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेमधून आलेल्या कार्यकर्त्यांचे सेनेत स्वागत केले.

Web Title: Sit back and forth in the work of the computer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.