शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

विक्रमी पावसाने जिल्ह्यात परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 1:41 AM

वर्षभराचा पाऊस दोन महिन्यांतच बरसला; महाड तालुक्याला पुराचा वेढा; माणगावमध्ये पाणीच पाणी

दासगाव : गेले १२ दिवस महाडमध्ये सतत पडणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम दळणवळणावर तसेच बाजारपेठेमधील व्यवहारावर व खेडेपाड्यातील वाहतुकीवर झाला आहे. सध्या आठ दिवसांचे पुराचे पाणी महाडकरांची डोकेदुखी ठरली असून यामध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानामध्ये शेती पहिल्या क्रमांकावर येत आहे.संपूर्ण जून महिना कोरडा गेला. जुलैपासून पावसाने कोकणात हजेरी लावली. यंदा पाऊस कशा प्रकारे लागतोय याची काळजी बळीराजाला लागली होती. दर वर्षाप्रमाणे पावसाचा बहर काढतो की नाही, याची चिंता महाडकरांना लागली असता २५ जुलैपासून महाडकरांवर जणू कहरच बरसवला. गेली १२ दिवस महाड तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या लागणाºया पावसामुळे काळ आणि सावित्री नदीने धोक्याची पातळी उलटण्यास सुरुवात केली. २ आॅगस्टपासून सतत लागणाºया पावसाने महाडकरांची झोपच उडवली. गेले पाच दिवस महाड तालुक्यातील बहुतेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आजही तालुक्यात दरडी आणि महाड बाजारपेठेत शिरणारे पाणी, पाण्याखाली गेलेली शेती, वाहतुकीला होणारे अडथळे, त्याचप्रमाणे व्यापारी, शेतकरी आणि वाहतूकदारांना बसणारा आर्थिक फटका अशा अनेक समस्यांना महाडकर नागरिकांना सामोरे जावे लागले आहे.तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये गेले आठ दिवस पुराचे पाणी कायम शेतीत आहे. शेकडो एकर जमीन पाण्याखाली आली आहे. लावणी झालेली शेती या पुराच्या पाण्यामुळे जवळपास गेल्यातच जमा आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. आपली शेती गेल्यात जमा असल्याने शेतकरी शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहेत. पाणी उतरल्यानंतर पंचनामे करून शासन त्यांना काय मदत देणार याकडे लक्ष लागले असले तरी या पुराच्या पाण्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.जनजीवन विस्कळीतरायगड मार्ग, बिरवाडी, विन्हेरे, खाडीपट्टा महाड शहराला जोडलेले हे मुख्य भाग आहेत. दरदिवशी या विभागातून हजारो नागरिक शहरात खरेदी-विक्री, डॉक्टर आणि शासकीय कामांसाठी ये-जा करतात. मात्र, रायगड-महाड मार्गावर त्याचबरोबर गांधारी पुलावर आणि दादली पुलावर पाणी साचल्याने मुख्य रस्ते बंद पडले आहेत. मिनीडोअर तसेच एसटी महामार्ग आणि खासगी वाहनांची वाहतूक बंद झाली आहे.माणगावमध्ये पावसाबरोबर वाढतेय नागरिकांची भीतीमाणगाव : तालुक्यास पावसाने चांगलेच झोडपले असून नागरिक आता या मुसळधार पावसामुळे भयभीत झाले आहेत. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर रेपोली ते तळेगाव दरम्यान रस्त्यावर पाणी साचल्याने चालकांना या पाण्यातून गाडी काढणे मोठ्या जिकिरीचे झाले. तसेच गोरेगावमध्ये तीन घराच्या भिंती या अतिवृष्टीमुळे पडल्या.गोरेगावमधील बाजारपेठेत केदार खुळे यांच्या घरची मागील भिंत कोसळली तसेच इंदू धर्मा केकाणे यांच्या घराचीही भिंत उन्मळून पडली. तसेच गोरेगावनजीक नागाव गावातील वसंत हाटे यांच्या घराची एक बाजू पडली. या सर्व घटनांमध्ये कोणतीच जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान झाले आहे.सोमवारी थोडा विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी पुन्हा जोरदार बरसण्यास सुरुवात केल्याने माणगाव तालुक्यात माणगाव, गोरेगाव, लोणेर, मौर्बा येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. सततच्या या पडणाºया पावसाने आता थांबावे, अशी प्रार्थना नागरिक करीत आहेत.महामार्गावर परिणाममहाड तालुक्यातून महाड औद्योगिक क्षेत्रात हजारो कामगार खेड्यापाड्यातून नोकरीसाठी जातात. मुख्य रस्त्यावर आलेले पाणी आणि बिरवाडी हद्दीतील महामार्गावर नडगाव येथे सतत कोसळणारी दरड यामुळे नोकरीनिमित्त जाणाºया कामगारांना देखील या पुराचा फटका बसला आहे. महाड तालुक्यातील गेले आठ दिवसांच्या पुराने महाडकरांचे किती मोठे नुकसान झाले, याची आकडेवारी नसली तरी शेतकरी, व्यापारी, वाहनचालक, खेडोपाड्यातील भाजीविक्रेते यांचा व्यवसाय बंद पडल्याने कोट्यवधीचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी महाड तालुक्यातील पूरस्थिती कायमच आहे.भालगाव मिठागरमध्ये दरड कोसळलीआगरदांडा : मुरुड तालुक्यातील भालगाव व मिठागर या दरम्यान दरड तसेच झाडे पडल्यामुळे वाहतूक बंद करण्यात करण्यात आली.दरड हटवण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. सलग पाच दिवस जोरदार पाऊस पडत राहिल्यामुळे झाडांसकट दगड व माती रस्त्यावर आल्याने जाम झाल्याने चिखल, माती रस्त्यावर पसरली होती. मोठी झाडे रस्त्यावर पडली. ठिकठिकाणी माती व झाडे दगड अशी पडझड पाहावयास मिळाली. काही ठिकाणी आणखी झाडे पडण्याच्या स्थितीत आहेत. ही दरड सायंकाळच्या दरम्यान कोसळल्याने शासकीय मदतकार्य मिळू शकले नाही. त्यामुळे एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.बाजारपेठ ठप्पमहाड तालुक्यातील १८० गावांचे मुख्य खरेदी-विक्री बाजारपेठ आहे. गेले आठ दिवस महाड शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे शहरात खरेदी-विक्रीसाठी येणाºयांची संख्या कमी झाली आहे. शहराला जोडणाºया मुख्य रस्त्यावरच पाणी आल्याने खेडोपाड्यातील नागरिकांनी येणे बंद केले आहे. गेले आठ दिवस बाजारपेठेतील सुकट गल्ली ते अनेक दुकानांमध्ये पाणी शिरत असल्याने बाजारपेठच ठप्प झाली आहे. यामुळे भाजीविक्रेते, मच्छीविक्रेते, किराणा दुकानदार, मेडिकल, अशा अनेक व्यापाºयांचे धंदे बंद पडल्याने यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.२०१८-१९ रोजीपर्यंत पडलेला पाऊसपावसाळा सुरू झाल्यापासून (दोन महिन्यांत) ६ आॅगस्ट २०१८ रोजीपर्यंत सरासरी २३२६.९१ मि.मी. पाऊस पडला होता.माथेरान ३५८४.५०म्हसळा २९९६.७८महाड २६४४.९०कर्जत् २५९०.२९माणगाव २५५६.००तळा २५४१.२०पेण २४६७.२५पोलादपूर २३९०.८०रोहे २२८८.००खालापूर २२८१.३०पनवेल २१९४.०२उरण १९०३.५०मुरुड १८८३.००श्रीवर्धन १८१६.१०अलिबाग १६७०.१०सुधागड १४२२.८७एकूण - ३७,२३०.६१सरासरी- २३२६.९१२०१९-२० रोजीपर्यंत पडलेला पाऊसपावसाळा सुरू झाल्यापासून (दोन महिन्यांत) ६ आॅगस्ट २०१९ रोजीपर्यंत सरासरी ३२१३.१४ मि.मी. पाऊस पडला होता.माथेरान ४६७३.६०पेण ४२२९.६०तळा ३९४२.००पोलादपूर ३६९४.००रोहे ३६४४माणगाव ३५८१.०५म्हसळा ३३०९.००कर्जत ३२८६.४०पनवेल ३११८.७८खालापूर ३०४२.००महाड ३०२९.००सुधागड २८७४.००श्रीवर्धन २५४१.००मुरुड २५२६,००उरण २११७.५०अलिबाग १८०२.२८एकूण - ५१,४१०.२१सरासरी- ३२१३.१४आकडेवारी मि.मीटरमध्ये

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस