सुधागडमध्ये अंगणवाड्यांच्या १८ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:52 AM2020-01-10T00:52:43+5:302020-01-10T00:52:49+5:30

सुधागड तालुक्यात १५६ अंगणवाडी आहेत, त्यामधील ३९ बंद तर ११७ सुरू आहेत.

Six buildings of Anganwadi buildings in Sudhagad dangerous | सुधागडमध्ये अंगणवाड्यांच्या १८ इमारती धोकादायक

सुधागडमध्ये अंगणवाड्यांच्या १८ इमारती धोकादायक

Next

विनोद भोईर 
पाली : सुधागड तालुक्यात १५६ अंगणवाडी आहेत, त्यामधील ३९ बंद तर ११७ सुरू आहेत. यापैकी १८ इमारती धोकादायक आहेत. यामध्ये चेरफळवाडी, आपटवणे, सिद्धेश्वर खु., घेरा सरसगड, वासुंडे, वाफेघर, ढोकशेत, परळी, चंदर गाव, माढल, नेनवली, गोंडाळे, झाप, देऊळवाडा, बेघरआळी, पाली बौद्धवाडा, नागशेत या गावांतील अंगणवाड्यांच्या इमारतीचा समावेश आहे.
शासन गाव तेथे मूलभूत सुविधा देण्याचे धोरण आखत असते; परंतु सुधागड तालुक्यातील ३० गावे देश स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत अंगणवाडी इमारतीपासून वंचित आहेत. इमारत नसल्याने गावातील मंदिर व समाजमंदिरात मुलांना बसविले जात आहे. यातील उद्धरआदिवासीवाडी, नेरे, गेटवाडी, तांबट माळ, हेदवली, कोशिंबळे, पावसाळवाडी, धारवाडी, वांद्रोशी, कळंब धनगरवाडी, कळंब आदिवासीवाडी, कडप्पावाडी, चव्हाणवाडी, केलगण, धोडीवली, तोरणपाडा, पाली आगरआळी, गौळमाळ, सिद्धेश्वर बु., झापतलई, दिघेवाडी, डुबेवाडी, खडसांबळे, कोंडी धनगरवाडी, नांदगाव आदिवासीवाडी, नेनवली, ठाणाळे आदिवासीवाडी यातील गावांचा समावेश असून, ३३५ मुलांना अंगणवाडी इमारत नसल्याने खासगी जागेत बसावे लागत आहे.
>मिनी सेविकांची ३९ पैकी पाच पदे रिक्त
१एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार सुरू असलेल्या ११७ अंगणवाड्यांतील १०६ सेविकांची पदे भरलेली आहेत, तर ११ रिक्त आहेत. मिनी सेविका एकूण ३९ पदे असून त्यातील ३४ पदे भरलेली तर पाच रिक्त आहेत.
२मदतनीस एकूण ११७ पदे त्यापैकी १०३ पदे भरलेली तर १४ पदे रिक्त आहेत. सुधागड तालुक्यात ११७ अंगणवाड्यांच्या एकूण मुलांची पटसंख्या ६०५५ आहे.
३बालविकास खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे व अपुऱ्या सोयीसुविधांमुळे पटसंख्या पूर्णत: कमी झाली आहे. पालकवर्गाकडून शासन व बालविकास खात्यावर नाराजी व्यक्त करून अक्षरश: खासगी बाल विद्यालयात उत्तम संस्कार घेण्यास नाइलाज म्हणून पाठविले जात आहे, असे पालकवर्गातून बोलले जात आहे.
४या गंभीर बाबीची शासनाने व संबंधित खात्याने दखल न घेतल्यास आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Web Title: Six buildings of Anganwadi buildings in Sudhagad dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.