मधुकर ठाकूर
उरण : उरण, न्हावा समुद्रमार्गे घारापुरी लेण्या पाहायला येणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांसाठी एकमेव ५० वर्षे जुन्या असलेल्या राजबंदर जेट्टीचा स्लॅब आणि जेट्टीखालील अनेक ठिकाणचे प्लास्टर शनिवारपासून कोसळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे महाशिवरात्री निमित्ताने मोठ्या संख्येने येणाºया पर्यटक आणि नागरिकांसाठी जेट्टी अत्यंत धोकादायक बनली आहे. या जेट्टीच्या दुरुस्तीकडे मुंबई मेरीटाइम बोर्डाच्या दुर्लक्षामुळे मात्र महाशिवरात्रीनिमित्ताने येणाºया हजारो भाविकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.नवी मुंबई, उरण, न्हावा, पनवेल, अलिबाग येथून घारापुरी बेटावर येणाºया पर्यटक आणि नागरिकांसाठी सुमारे ५० वर्षे जुनी असलेली राजबंदर येथील एकमेव जेट्टी आहे. पर्यटकांबरोबरच बेटावर वसलेल्या राजबंदर, शेतबंदर, मोराबंदर या तिन्ही गावांतील नागरिकांनाही बाजारहाट आणि समुद्रमार्गे ये-जा करण्यासाठी वापर केला जातो.
दरवर्षी घारापुरी बेटावर महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. देशी-विदेशी पर्यटकांमुळे बेटावरील महाशिवरात्रीला इंटरनॅशनल महाशिवरात्री म्हणूनही ओळखले जाते. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्ताने सुमारे ७०-८० हजार शिवभक्त बेटावर येतात. तेही याच राजबंदर जेट्टीवरून उतरून मार्गस्थ होतात. मुंबई मेरीटाइम बोर्डाच्या अखत्यारित असलेल्या या जेट्टीची सुमारे सात वर्षांपूर्वी तकलादू दुरुस्तीही करण्यात आली आहे. मात्र, राजबंदर जेट्टीचा स्लॅब आणि जेट्टीखालील अनेक ठिकाणचे प्लास्टर शनिवारपासून कोसळण्यास सुरुवात झाली आहे. या धोकादायक ठरू लागलेल्या जेट्टीची दुरुस्ती करण्यात यावी, अशी लेखी मागणी दरवर्षी मुंबई मेरीटाइम बोर्डाकडे केली जात असते. मात्र, दुरुस्तीसाठी बंदर विभागाकडे निधी नसल्याची कारणे देत दरवर्षी बंदरविभागाकडून दुर्लक्षच केले जात असल्याचा आरोप घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी केला आहे.मेरीटाइम बोर्डाच्या अभियंत्यांकडून पाहणीच्ग्रामपंचायतीने कळविल्यानंतर धोकादायक राजबंदर जेट्टीची रविवारी मुंबई मेरीटाइम बोर्डाचे सहायक अभियंता पी.एल.बागुल यांनी पाहणीही केली. यामुळे शिवभक्तांची होणारी गैरसोय तातडीने दूर करण्यासाठी बंदर विभागाकडून कोणती उपाययोजना केली जाते, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.