आंबा, साग, खैरांसह २० झाडांची कत्तल : विकासकावर कारवाईची शेतकऱ्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 06:32 PM2023-04-29T18:32:33+5:302023-04-29T18:32:52+5:30

मौजे चिरनेर हद्दीत असलेल्या शेतजमिनी लगतच्या जमीनवर एका विकासकाने प्रकल्पाचे काम सुरू केले आहे.

Slaughter of 20 trees including mango, teak, khair: Farmers demand action against developer | आंबा, साग, खैरांसह २० झाडांची कत्तल : विकासकावर कारवाईची शेतकऱ्यांची मागणी

आंबा, साग, खैरांसह २० झाडांची कत्तल : विकासकावर कारवाईची शेतकऱ्यांची मागणी

googlenewsNext

मधुकर ठाकूर 

उरण : प्रकल्प विकसित करण्याच्या नावाखाली खासगी शेतकऱ्यांचा जागेतील साग,खैर,आंबा आदी विविध २० झाडे जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी चिरनेर येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

मौजे चिरनेर हद्दीत असलेल्या शेतजमिनी लगतच्या जमीनवर एका विकासकाने प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. त्यांनी  शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मालकीच्या शेतजमीनीतील बांधबंदिस्ती जेसीबी मशीनच्या साह्याने उध्वस्त करून आंबा- ३ , साग- २, खैर- २  व इतर विविध प्रकारची २० झाडे  तोंडून टाकली आहेत.याप्रकरणी शेतकऱ्यांनी सदर विकासकावर कारवाई करण्याची मागणी  तहसीलदार, पोलीस तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली असल्याची माहिती.शेतकऱ्यांनी दिली.

Web Title: Slaughter of 20 trees including mango, teak, khair: Farmers demand action against developer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.