शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

दिवाळीच्या खरेदीवर मंदीचे सावट 

By निखिल म्हात्रे | Published: October 23, 2022 1:30 PM

लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - उद्यावर दिवाळी आली असताना अद्याप नोकरदार वर्गाचा पगार झाला नसल्याने खरेदीदारांमध्ये आज मंदीचे सावट ...

लोकमत न्युज नेटवर्कअलिबाग - उद्यावर दिवाळी आली असताना अद्याप नोकरदार वर्गाचा पगार झाला नसल्याने खरेदीदारांमध्ये आज मंदीचे सावट दिसून येत आहे. त्यातच यावर्षी प्रत्येक वस्तुंच्या दरात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली असल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री बसली आहे. त्यामुळे बाजारपेठा जरी सजल्या-असल्या तरी ग्राहक मात्र वस्तु खरेदी करण्यासाठी फिरकत ही नाहीत.

यंदा भाववाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठय़ा प्रमाणावर कात्री बसत आहे. बाजारात साध्या, रंगकाम न केलेल्या वेगवेगळ्या आकारातील पणत्या 8 रुपयांपासून ते 70 रुपयांपर्यंत प्रतिनग या भावाने बाजारात उपलब्ध आहेत. रंगकाम केलेल्या आकर्षक व कुंदनजडीत पणत्या 80 रुपयांपासून 170 रुपयांपर्यंत प्रतिडझन या भावाने विक्री होत आहे. रांगोळ्यांचे स्टीकर, स्वस्तिक व लक्ष्मीची पावले 10 ते 30 रुपयांच्या घरात उपलब्ध आहेत.

रांगोळ्यांचे ठसे, रंग भरण्यासाठी जाळीची झाकणे असलेल्या डब्या व रोल यांनाही चांगली मागणी आहे. त्याचबरोबर दारावरील तोरण आणि झुंबरांचेहीविविध प्रकार बाजारात पाहावयास मिळत आहेत. विविध रंग आणि रांगोळ्यांमुळे बाजारपेठा अधिकच खुलून दिसत आहेत. रंग 5 रुपये 50 ग्रॅम या किमतीमध्ये तर रांगोळी मिक्स कलरच्या डब्या यंदा 10 रुपये किमतीमध्ये उपलब्ध आहेत. रांगोळी पुस्तक 10 ते 50 रुपयांपर्यंत असून घरगुती उटणे 5 रुपये एक पॅकेट बाजारात उपलब्ध आहेत.पावसाळी कंदीलयंदा बाजारात नवीन विजेच्या सिंगल पणत्या दाखल झाल्या आहेत, तर रंगांचे विविध प्रकारही एका डब्ब्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे पाऊस अधूनमधून येत असल्याने बांबूच्या आणि कापडाच्या कंदिलाला मोठय़ा प्रमाणावरमागणी असल्याचे दिसून आले.वस्तू महाग -यंदा वस्तूंच्या किमतीमध्ये 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दुकानदारांनी सांगितले. जीएसटी, नोटबंदी यांचा फटका यंदा बाजारपेठांवर बसल्याने त्यांची कस भरून काढण्यासाठी किमतीमध्ये वाढ झाली आहे, परंतु किमती वाढल्या असल्या तरीही विविध वस्तू खरेदीकडे नागरिकांचा कल असल्याचेसांगत त्या तुलनेत कपडय़ांच्या दुकानात फार गर्दी नसल्याने व्यापारी चिंतेत असल्याचे त्यांनी सांगितले.भारतीय बनावटीच्या वस्तूंना पसंतीयंदा बाजारपेठेचा 90 टक्के भाग हा भारतीय बनावटीच्या दिवाळीपयोगी वस्तूंनी आच्छादला आहे. चिनी बनावटीच्या मालावर बहिष्कार टाकत नागरिकांची भारतीय बनावटीच्या मालालाच पसंती दिली आहे.रांगोळीच्या स्टिकरला मागणीदिवाळी उत्सवाला बाजारामध्ये विविध वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यात स्टिकरमधील रांगोळी, उंबरठ्याचा पट्टा, तोरण अशा विविध वस्तूंची मागणी सुद्धा वाढली आहे. रांगोळीचे स्टिकर याची मागणी बाजारात मोठ्या रुपये. प्रमाणात होत आहे. या वस्तूंच्या दरातही दहा ते पंधरा टक्के भाव वाढ झाल्याचे व्यवसायिकांनी सांगितले आहे

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022Inflationमहागाई