तळोजात स्वतंत्र टाऊनशिपचा नारा

By admin | Published: November 22, 2015 12:35 AM2015-11-22T00:35:00+5:302015-11-22T00:35:00+5:30

पनवेल महानगपालिकेसाठी ह‘लचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार प्रस्तावित महापालिकेत तळाजो उद्योगिक क्षेत्राचा समावेश होण्याची शक्यता आहे. परंतु येथील उद्योजकांचा त्याला

Slow of an independent township in the basement | तळोजात स्वतंत्र टाऊनशिपचा नारा

तळोजात स्वतंत्र टाऊनशिपचा नारा

Next

- शैलेश चव्हाण,  तळोजा
पनवेल महानगपालिकेसाठी ह‘लचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुसार प्रस्तावित महापालिकेत तळाजो उद्योगिक क्षेत्राचा समावेश होण्याची शक्यता आहे. परंतु येथील उद्योजकांचा त्याला विरोध असून, त्यांनी स्वतंत्र टाऊनशिपचा नारा दिला आहे.
राज्यातील एमआयडीसी क्षेत्रांना स्वतंत्र टाऊनशिपचा दर्जा देण्याचा निर्णय २00७ मध्ये तत्कालीन सरकारने घेतला होता. तेव्हापासून तळोजा एमआयडीसीतील उद्योजकांचा स्वतंत्र टाऊनशिपसाठी पाठपुरावा सुरू आहे. विशेष म्हणजे तळोजातील उद्योजकांकडून पनवेल नगरपालिकेला कोणत्याही प्रकारचा कर मिळत नाही. येथील उद्योजक ग्रामपंचायतीला कर भरतात. असे असले तरी पनवेल महापालिकेसाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे उत्पन्नाचे मुख्य स्रोत ठरणारी तळोजा औद्योगिक वसाहतीचा प्रस्तावित महापालिकेत समावेश व्हावा, यासाठी हालचाली सुरू आहेत. परंतु उद्योजकांचा त्याला विरोध आहे.
यासंदर्भात तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. यासंदर्भात ठोस धोरण ठरविण्यासाठी दोन दिवसांपूर्वी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांची अलीकडेच एक बैठक बोलावण्यात आली होती. कोणत्याही परिस्थितीत पनवेल महापालिकेत समाविष्ट व्हायचे नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच तळोजा एमआयडीसीला स्वतंत्र टाऊनशिपचा दर्जा मिळावा, यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना मध्यस्थी करण्याचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला.

तळोजा एमआयडीसीतील विकासकामांवर गेल्या अडीच वर्षांत असोसिएशनच्या वतीने जवळपास २७0 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. येथील उद्योगांना अधिक दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र टाऊनशिपशिवाय पर्याय नसल्याचे मत असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Slow of an independent township in the basement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.