सिकंदर अनवारे दासगाव : मुंबर्ई-गोवा राष्टÑीय महामार्ग चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर अनेक तांत्रिक अडचणीमुळे आजही ते काम रखडले आहे. चौपदरीकरणाचे महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम इंदापूर ते पोलादपूर महाड तालुका आणि पोलादपूर तालुका हद्दीत एल अॅण्ड टी कंपनीने सुरु देखील केले आहे. महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यात १०४ गावांना इको सेन्सेटिव्ह झोन लागू असल्याने या ठिकाणी मातीचे उत्खनन करता येत नाही. चौपदरीकरणाच्या कामात मातीच्या भरावासाठी मोठ्या प्रमाणात माती लागणार आहे. या झोनमुळे मातीचे उत्खनन होत नसल्यामुळे चौपदरीकरणाचे दुसºया टप्प्याचे काम अडचणीत आले आहे.मोºया आणि भरावांची कामे तसेच वळण काढण्याची काम व खिंड फोडण्याची कामे मोठ्या तेजीत सुरू झाली आहेत. चौपदरीकरणाच्या भरावासाठी लाखो ब्रास मातीची गरज आहे. सध्या महामार्गाने चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जमिनीत असणारे डोंगर, वळण फोडून त्याच मातीचे नवीन रस्त्यावर भरावाचे काम सुरू आहे. या निघणाºया थोड्याशा मातीने नवीन रस्त्याचे भराव पूर्ण होणार नसून अनेक डोंगरातून माती उत्खननाची गरज आहे. महाड तालुक्यातील वीर आणि पोलादपूर तालुक्याच्या गाव हद्दीपर्यंत १०४ गावांना इको सेन्सेटिव्ह झोन लागू केल्यामुळे त्या गावांमध्ये माती उत्खनन करता येत नाही. मात्र अशावेळी चौपदरीकरणाच्या या कामाला भरावासाठी माती कोठून उपलब्ध होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या माती भरावासाठी मिळत नसल्याने दुसºया टप्प्याचे महाड आणि पोलादपूर तालुक्यातील चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू असून अडचणीत आले आहे. पश्चिम घाट क्षेत्रातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणजे इको सेन्सेटिव्ह झोन पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने केंद्रीय पर्यावरण विभागाने निर्माण केलेल्या समितीने सहा राज्यातील काही भाग संवर्धन यादीत रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ६८ आणि पोलादपूर तालुक्यातील ३६ असे दोन्ही तालुके मिळून इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये १०४ गावांमध्ये पर्यावरणाला हानिकारक ठरेल असे कोणतेच काम करता येणार नाही.माती उत्खनन, झाडांची तोड, बांधकामे असे असताना याच विभागात महाड आणि पोलादपूर तालुक्यातील राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.या चौपदरीकरणामध्ये नवीन रस्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाखो ब्रास मातीची गरज आहे. या दुसºया टप्प्यातील होत असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणालगत बहुतेक गावांमध्ये इको सेन्सेटिव्ह झोन लागू असल्याने या होणाºया चौपदरीकरणाच्या कामाला माती मिळणे कठीण झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत चौपदरीकरणासाठी भूसंपादित असलेल्या जागेमधूनच निघणाºया मातीचे भराव सुरू आहे. ही माती काही दिवसातच संपणार आहे. मात्र यानंतर माती क ोठून मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.दोन वर्षांत कामपूर्ण करणारएल अॅण्ड टी सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या सुरू असलेले दुसºया टप्प्याचे काम योग्यरीत्या सुरू असून इको सेन्सेटिव्ह झोनमुळे मातीची कमतरता भासत असल्याने धीम्या गतीने काम सुरू आहे. मातीसाठी अडचणी निर्माण होत असल्या तरी हे दुसºया टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम दिलेल्या कालावधीतच पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येतील.झोनची सीमा निश्चित करावी२०१४ मध्ये इको सेन्सेटिव्ह झोनचा निर्णय अंमलबजावणीत आला. गावपातळीवर सरपंच, स्थानिक वनरक्षक, तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांची समिती तयार करून या समितीने परिसंवेदनशील क्षेत्राच्या संबंधात जनसुनावणी घेवून त्या क्षेत्राची प्रत्यक्ष तपासणी करून त्याचे चिन्हांकन करून त्याचा नकाशा तयार करावा. प्रत्यक्ष तपासणीच्या आधारे तयार केलेल्या अहवालाचा अभ्यास करून गावातील नैसर्गिक जैवविविधतेने समृद्ध भूक्षेत्र, मानव निर्मित भूवापर, वनक्षेत्र, तलाव, नदी, नाले, गुरचरईचे क्षेत्र विचारात घेवून परिसंवेदनशील क्षेत्राची आलेखना करावी. मात्र अशावेळी गावचे गावठाण क्षेत्र, शेती खालील क्षेत्र, अकृषिक वापराखालील भूक्षेत्र याचा विचार करूनच इको सेन्सेटिव्ह झोन विभाग निश्चित करावा. सध्या महाड आणि पोलादपूर तालुक्यातील ज्या १०४ गावांना इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर झाला आहे त्या गावांमध्ये अशा प्रकारे कोणतीच सीमा निश्चित करण्यात आलेली नसून सरसकट गाव जाहीर करण्यात आलेले आहेत. कोणत्याही सर्वे नंबरचा देखील उल्लेख ही केलेला नाही. मात्र यामुळे चौपदरीकरणाच्या महामार्गाच्या कामासाठी माती उत्खननासाठी अडचण निर्माण झालीच. मात्र पुढे जावून स्थानिक नागरिकांना याचा फटका चांगलाच बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इको सेन्सेटिव्ह झोनमुळे चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 2:41 AM