80 लाख रुपये किमतीच्या दोन दुर्मिळ खवल्या मांजरांची तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 05:27 PM2018-12-16T17:27:07+5:302018-12-16T17:27:29+5:30
श्रीवर्धन मधील पाच जणांना सापळा रचून रंगेहाथ अटक
- जयंत धुळप
अलिबाग : अत्यंत दूर्मीळ आणि अतिसंरक्षीत वन्य संस्तन प्राणि श्रेणीतील 8० लाख रुपये किमतीच्या दोन दुर्मिळ खवल्या मांजरांच्या तस्करी करणार्या पाच जणांना श्रीवर्धन तालुक्यांतील वाळवटी-खेडी येथे सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकास शनिवारी सापळा लावून रंगेहाथ अटक करण्यात यश आले आहे.
श्रीवर्धन-शेखाडी रस्त्यालगत असणा-या नजफ आराई यांच्या दानीयल फार्म येथे शनिवारी सापळा रचून रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये फैजल अब्दुल अजीज काळोख (42, रा.घोली मोहल्ला, ता.श्रीवर्धन), निलेश अनंत कर्नेकर (3र्2े, रा.जीवनेश्वर पाखाडी, ता.श्रीवर्धन), अशोक गणपत दर्गे (55, रा.कसबापेठ, ता.श्रीवर्धन) आणि किशोर महादेव मोहिते(43, रा.खेडी ता. श्रीवर्धन) या पाच जणांचा समावेश आहे. या पाच जणांकडून जप्त करण्यात आलेल्या या दोन खवल्या मांजरांची आंतरराष्ट्रीय बाजारात किमंत 8० लाख रुपये असून, वन्य जीव संरक्षण अधिनियम सन 1972 अंतर्गत संरक्षित वर्ग -1 मधील ही प्रजाती असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांनी सांगितले.
खात्रीशीर खबर्याकडून प्राप्त माहितीअंती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर व अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक जे.ए.शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोसई आर.बी. वळसंग व पोलीस पथक यांनी ही कारवाई केली आहे. पोलीसांनी जप्त केलेली दोन खवल्या मांजरे पूढील कार्यवाही करिता वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.