शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आतापर्यंत जनआशीर्वाद यात्रेचा ४ हजार ५०० किमीपेक्षा जास्त प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:45 PM

जनआशीर्वाद यात्रा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या भूमीत अवतीर्ण झाली आहे.

पेण : जनआशीर्वाद यात्रा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या भूमीत अवतीर्ण झाली आहे. रायगडावर शिवसेनेचा भगवा कायम फडकत राहिलेला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकत असल्याने रायगड शिवसेनेसाठी अवघड नाही, तुम्ही निश्चिंत रहा, पुढचं काय होणार आहे ते बघून घेवू. जनआशीर्वाद यात्रेत मी महाराष्टÑातील तमाम जनतेशी संवाद साधीत असून आतापर्यंत ४ हजार ५०० किमीपेक्षा जास्त प्रवास करून ९० विधानसभा मतदारसंघात जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेतलेले आहेत. सगळ्याच ठिकाणी मला शिवसेनेच्या भगव्याचे दर्शन घडले. शेतकरी, कष्टकरी, कामगार, बेरोजगार, प्रदूषणमुक्त महाराष्टÑ, पर्यावरण प्रफुल्लित महाराष्टÑ घडविण्यासाठी मला सर्वांची साथ हवी आहे, असे प्रतिपादन शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पेण येथील जनसंपर्क यात्रेप्रसंगी जनतेशी संवाद साधताना केले.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनसंपर्क यात्रा पेणमध्ये दुपारी २ वाजता दाखल झाली. पेणच्या आगरी समाज विकास मंच या सभागृहात आदित्य ठाकरे यांनी पेणच्या जनतेशी सुसंवाद साधला. याप्रसंगी आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, कोणाला निवडून आणायचे कोणाचे सरकार येणार हा विषय बाजूला ठेवून शिवसेना ८० टक्के समाजकारण करते, वर्षातील ३६५ दिवस माझा शिवसैनिक हे समाजसेवेचे व्रत नित्यनेमाने पाळतो. राजकारणाच्यावेळी राजकारण हे तेवढ्यापुरतेच सीमित राहते. शिवसेनेमध्ये कोणी आमदार होतो, कोणी खासदार, कोणी मंत्री होतो, परंतु या सर्वांपेक्षा माझा शिवसैनिक मोठा आहे. शिवसैनिक आणि शिवबंधनाचा धागा हा शिवसेनेचे जीव की प्राण आहे. त्या शिवसैनिकांना व जनतेला भेटण्यासाठीच माझी ही जनआशीर्वाद यात्रा असल्याने त्यांनी सांगितले. जनआशीर्वाद यात्रा ही मी तीर्थयात्रा समजतो यामुळेच मला या यात्रेत महाराष्टÑातील आबालवृद्धांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. तुम्ही माझ्याकडे जी निवेदने दिलीत त्या समस्या दूर करण्यासाठीच व नवा महाराष्टÑ घडविण्याचा संकल्प या जनआशीर्वाद यात्रेचा मूळ हेतू आहे. याच चांगल्या कामासाठी मला सर्वांचीच सोबत हवी आहे. चला पुढे जाऊ या आणि नवा महाराष्टÑ घडवूया असे ते शेवटी सांगितले.याप्रसंगी उपस्थितांमध्ये शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी याशिवाय आ. सचिन अहिर, बबन पाटील, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा प्रमुख किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिकांची उपस्थिती होती.>रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी सभारायगड जिल्ह्यातील माणगाव, कर्जत, मोहपाडा, अलिबाग, पनवेल येथे जनआशीर्वाद यात्रा दाखल झाली होती, यावेळी आदित्य ठाकरे यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन जनतेशी संवाद साधला. यावेळी भावनिक आवाहन त्यांनी के ले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019