... म्हणून बॅनर लावून जिवंत बहिणीला वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 02:15 AM2019-11-03T02:15:30+5:302019-11-03T02:15:53+5:30

बहिणीने शहरातील बॅनर बघितल्यावर हताश होऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही समोर येत आहे.

... so a tribute to the living sister with the banner in raigad | ... म्हणून बॅनर लावून जिवंत बहिणीला वाहिली श्रद्धांजली

... म्हणून बॅनर लावून जिवंत बहिणीला वाहिली श्रद्धांजली

googlenewsNext

म्हसळा : बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग आल्याने सख्ख्या भावाने तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून तशा आशयाचा बॅनर शहरातील चौकात लावला. एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे घडलेल्या या प्रकाराची सध्या शहरात जोरदार चर्चा आहे. बहिणीने शहरातील बॅनर बघितल्यावर हताश होऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही समोर येत आहे.

३० आॅक्टोबर रोजी म्हसळा शहरातील एका तरुण व तरुणीने प्रेमविवाह करून पोलीस ठाण्यात विवाह झाल्याची माहिती दिली होती. मात्र, हा विवाह मुलीच्या भावाला व त्याचा मित्रांना मान्य नव्हता, त्यामुुळे त्याने शहरातील एका स्थानिकाच्या मदतीने बहिणीला मृत ठरवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्याचा बॅनर शहरात लावला. शुकवार, १ नोव्हेंबर रोजी लावलेला बॅनर काढला असता, पुन्हा शनिवारी अशाच आशयाचा बॅनर शहरात झळकवण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत असून बॅनर छपाई करणारे व लावणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

प्रेमविवाह केल्याचा राग । शहरातील नागरिकांमध्ये संताप

पोलिसांत तक्रार
मुलीच्या भावाने व त्याच्या मित्राने बॅनरबाजीचे हे सर्व प्रकरण सुरू केल्याने दोन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीने हताश होऊन विष प्राशन करून आत्महतेचा प्रयत्न केला. पीडित तरुणीच्या जबाबानुसार पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

Web Title: ... so a tribute to the living sister with the banner in raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.