सोहमचा विक्रमी जलतरण प्रवास

By Admin | Published: December 27, 2016 02:36 AM2016-12-27T02:36:43+5:302016-12-27T02:36:43+5:30

कणे गावचा छोटा बालवीर सोहम पाटील या दहा वर्षांच्या मुलाने मोरा-उरण ते गेटवे आॅफ इंडिया हे १६ किमी नॉटीकल अंतर पोहून अवघ्या ३ तास १६ मिनिटांत यशस्वीरीत्या पार

Soham's Vikramika Swimming Tour | सोहमचा विक्रमी जलतरण प्रवास

सोहमचा विक्रमी जलतरण प्रवास

googlenewsNext

पेण : कणे गावचा छोटा बालवीर सोहम पाटील या दहा वर्षांच्या मुलाने मोरा-उरण ते गेटवे आॅफ इंडिया हे १६ किमी नॉटीकल अंतर पोहून अवघ्या ३ तास १६ मिनिटांत यशस्वीरीत्या पार
केले. यावरून तो भविष्यात उत्तम जलतरणपटू होणार याची प्रचिती आणून दिली.
कणे गावातील प्राथमिक शिक्षकाचा मुलगा भविष्यात उत्तम स्वीमर बनणार याबद्दल सर्वांचीच खात्री पटल्याने कणे ग्रामस्थ मंडळी, पाटील कुटुंबीय व मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बुधवारी २१ डिसेंबर रोजी मोरा-उरण येथून सकाळी ७ वाजता सोहमने समुद्रात उडी घेवून गेटवेच्या दिशेने पोहण्यास सुरुवात केली. सडपातळ देहयष्टी व लहान वयाची तमा न बाळगता प्रवास सुरु के ला.उद्दिष्टाप्रत जाण्याची जिद्द व मेहनत याची पहिली परीक्षा अथांग समुद्राच्या भव्यतेवर पोहणारा हा बालवीर आपला स्टॅमिना तसूभर ही कमी होऊ न देता पोहत राहिला. मैल, दोन मैल, पाच मैल, दहा मैल व अंतिम टप्पा अशा ध्येयाप्रती जात अखेर कापले. उद्दिष्ट साध्य करून सोहमने १० वाजून १६ मिनिटांनी गेटवे गाठून आपल्या पहिल्या सागरी जलतरण प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. कणे मित्र मंडळ परिवाराचा सदस्य असलेल्या हा छोटा मित्र अखेर आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यात यशस्वी ठरला. गेटवे आॅफ इंडिया मुंबई येथे त्यांचे खास अभिनंदन करण्यासाठी पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील, जिल्हा परिषद सदस्य कौशल्या पाटील, नवनिर्वाचित नगरसेविका ममता लांगी पाटील, काँग्रेस युवा नेते ललित पाटील, प्रशिक्षक सविन शिंगरूत आदी उपस्थित होते.
या जलतरण प्रवासात सोहमला सहायक स्वीमर म्हणून श्रवण ठाकूर, सिद्धेश धनावडे, हिमांशू मलबारी, प्रितेश करडे, ऋषिकेश कालन, जनीन शिंगरून आणि स्वराली म्हात्रे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Soham's Vikramika Swimming Tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.