शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आपद्ग्रस्तांसाठी कष्ट घेतल्याचे मिळाले समाधान; महाडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 1:43 AM

गेल्या वर्षी १ आॅगस्टला नाइट राउंडला असताना वायरलेस सेटवर मेसेज मिळाला, ‘गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नांगलवाडी फाट्याजवळील पूल कोसळला...

- जयंत धुळपअलिबाग : गेल्या वर्षी १ आॅगस्टला नाइट राउंडला असताना वायरलेस सेटवर मेसेज मिळाला, ‘गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नांगलवाडी फाट्याजवळील पूल कोसळला... काही गाड्या सावित्री नदीच्या पुरात वाहून गेल्यात...’ तत्काळ पुलाजवळ पोहोचलो, अर्धा पूल तुटून नदीत कोसळल्याचे दिसले... त्याच क्षणाला पत्नीचा फोन आला, ‘बाबांची तब्येत बरी नाही, त्यांना कल्याणला हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल केलेय, तुम्ही ताबडतोब या...’ तेव्हा मनाची मोठी घालमेल झाली... त्या वेळी मी केवळ येतो सांगितले आणि समोर आलेल्या प्रसंगाला प्रथम सामोरे जाण्याचा निर्णय घेतला... अशा अंगावर काटा आणणाऱ्या स्मृती महाडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी सांगितल्या. या दुर्घटनेत कर्तव्यावर असताना वडिलांची अखेरची भेट झाली नाही याचे शल्य मनात होते. पण त्याच वेळी जे काम मी करीत होतो त्याचे समाधान माझ्या वडिलांना मी अखेरच्या क्षणी देऊ शकलो याचे मात्र समाधान वाटते, असे ते म्हणाले.ते सांगतात, पत्नीचा फोन ठेवला आणि दुसरा तिसरा काहीही विचार न करता... प्रथम वाहतूक थांबविली, शक्य ती आपत्ती निवारणात्मक उपाययोजना अंमलात आणली. भीषण अंधार... धोधो पाऊस... किती गाड्या वाहून गेल्या काही अंदाज नाही... सारे वातावरण भीतिदायक होते. त्यानंतर रातोरात जिल्हा, राज्य आणि केंद्रीय स्तरावरील सारी यंत्रणा सक्रिय कार्यरतझाली.रत्नागिरी जिल्ह्यातून निघालेल्या दोन एसटी बसेस मुंबईत अपेक्षित वेळी पोहोचल्या नव्हत्या, त्या पूल पडला त्या वेळीच येथे असण्याची दाट शक्यता होती आणि अखेर तीच शक्यता खरी ठरली. त्यातच एक तवेरा गाडीदेखील वाहून गेल्याची खातरजमा झाली. रायगडचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक आणि तत्कालीन जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले रातोरात घटनास्थळी पोहोचले. सावित्री नदीकिनारी दोन्ही बाजंूनी शोधमोहीम सुरू करण्यात आली. मध्यरात्र सरकून पहाट जशी होऊ लागली तसे आक्रोश करीत सावित्री पुलाजवळ पोहोचणारे रत्नागिरीमधील नातेवाईक, वातावरण अत्यंत गंभीर करून टाकत होते.महाड औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांनी आपत्ती निवारणाकरिता सहकार्याचा हात पुढे केला. सकाळी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली. प्रत्यक्ष घटनेचा प्रथमदर्शी मी असल्याने त्यांनी माझ्याकडून माहिती घेतली आणि आपल्या फायबर बोटींच्या माध्यमातून खळाळत वाहणाºया सावित्रीच्या प्रवाहात शोधमोहीम सुरू केली. त्यांना आवश्यक ती सारी माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मी त्यांच्या सोबतच होतो, असे सांगून शिंदे काही क्षण थांबले.अखेर वडिलांचे निधन झाले...पुढील चार दिवस शोधमोहिमेत एसटीचे अवशेष सापडले, बानकोटच्या खाडीत मृतदेह सापडले. पण तिकडे बाबांची तब्येत पुन्हा गंभीर झाली. आता तरी तुम्ही या, असा पत्नीचा फोन आला. पण मी गेलो नाही. आणि अखेर ७ आॅगस्ट २०१७ रोजी वडिलांचे निधन झाले. निधन झाले आहे आता तरी निघा, असा पत्नीचा निर्वाणीचा फोन आला.तिला सांगितले, बाबांचे शव रुग्णवाहिकेतून घेऊन गावी (चोपडा-जळगाव) निघा, मी येथून निघतो. त्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना हा कौटुंबिक प्रसंग सांगितला. त्यांना धक्काच बसला आणि अखेर सावित्रीच्या किनाºयावरून गावी निघालो, अशी आठवण त्यांनी सांगितली.वडिलांना माझा अभिमान वाटलापुन्हा पत्नीचा फोन आला, तुम्ही येताय ना, बाबा तुमची आठवण काढताहेत. मी केवळ हो साहेबांशी बोलतो आणि निघतो असे सांगितले आणि फोन ठेवला. पण आपत्तीमधील हे काम अर्धवट सोडून आपण जावे यासाठी माझे मन तयार नव्हते. अखेर दुसºया दिवशी या दुर्घटनेची बातमी पत्नीने पाहिली तेव्हा तिला सारा उलगडा झाला. तिने ती बातमी बाबांना हॉस्पिटलमध्ये वाचून दाखविली आणि पत्नीचा पुन्हा फोन आला, बाबांना तुमचा अभिमान वाटत असल्याचे तिने सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड