पावसाने कुं भार व्यावसायिक अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 02:14 AM2019-11-06T02:14:13+5:302019-11-06T02:14:27+5:30
चुली-मडकींची झाली पुन्हा माती : मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान; भरपाईची मागणी
उदय कळस
म्हसळा : या वर्षी जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी बनविलेल्या मातीच्या चुली, मडकी व इतर वस्तूंची फार मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. आमचे संपूर्ण कुटुंब हे याच व्यवसायावर अवलंबून आहे. अजूनही पाऊस थांबायचे नाव घेत नाही, त्यामुळे आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण कसे करायचे? आमचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शासनाने आम्हास मदत करावी, अशी मागणी म्हसळा येथील कुं भार व्यवसाय करणाऱ्या विद्या बिरवाडकर यांनी के ली आहे.
अतिवृष्टी आणि सतत घोंगावणाºया चक्रिवादळामुळे कुंभार व्यावसायिकांसमोर बºयाच अडचणी निर्माण झाल्या असून, कुंभार व्यावसायिकांनी विकण्यासाठी बनविलेल्या मातीच्या चुली, मडकी, मातीची खेळणी भिजली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने गांभीर्याने विचार करून कुंभार व्यावसायिकांना भरपाई देण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची मागणी के ली आहे.
मातीच्या चुली, मडकी आणि इतर वस्तू बनवून विकू न उदरनिर्वाह करणाऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. या सर्व वस्तू भिजून ओल्या चिंब झाल्याने त्या विकण्यायोग्य राहिल्या नसल्याने व्यावसायिक चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येते. साधारण गणपती व दसरा झाल्यानंतर मातीच्या वस्तू बनविण्याची कामे सुरू
होतात. त्यासाठी एका खड्ड्यात माती किमान दोन दिवस फुगत ठेवणे गरजेचे असते. माती गरजेनुसार फुगल्यानंतर त्याच्या वस्तू बनवून त्या भाजून विक्रीसाठी बाजारात
आणल्या जातात; परंतु या वर्षी आजतागायत पाऊस असल्याने व्यवसाय करायचा की नाही? असा प्रश्न पडला असून केवळ कुंभार व्यवसायावर अवलंबून असणाºया कुटुंबाने काय करायचे, अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.