सोनालीच्या कुटुंबीयांची प्रकल्प अधिका-यांनी घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 02:57 AM2017-10-25T02:57:06+5:302017-10-25T02:57:08+5:30

कर्जत : कर्जत तालुक्यातील मोरेवाडी या आदिवासीवाडीतील १८ महिन्यांच्या सोनालीचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची घटना नुकतीच येथे घडली.

Sonal's family members took a meeting with the project officials | सोनालीच्या कुटुंबीयांची प्रकल्प अधिका-यांनी घेतली भेट

सोनालीच्या कुटुंबीयांची प्रकल्प अधिका-यांनी घेतली भेट

Next

कर्जत : कर्जत तालुक्यातील मोरेवाडी या आदिवासीवाडीतील १८ महिन्यांच्या सोनालीचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची घटना नुकतीच येथे घडली. याबाबत माहिती घेण्यासाठी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय पेणचे प्रकल्प अधिकारी गजेंद्र केंद्रे यांनी मंगळवारी सकाळी सोनालीच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
भेटीदरम्यान त्यांनी अंगणवाडीमार्फत दिल्या जाणाºया आहाराबाबत चौकशी केली. याच वाडीत आणखी तीन मुले सॅम श्रेणीतील तर दोन मुले मॅम श्रेणीतील आहेत. या मुलांची योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सदर अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त आहे, व्हिजिट बुक उपलब्ध नाही, मागील महिन्यापासून डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार बंद आहे, अर्धवट बांधकामामुळे अंगणवाडी मदतनिसाच्या घरीच भरवली जाते. या इतरही समस्या समजून घेत या वेळीच सुधारण्याच्या सूचना त्यांनी बालविकास विभागाच्या निशिगंधा भवार यांना दिल्या.
सोनालीचा मृत्यू कुपोषणाने नाहीतर दुसºया आजाराने झाल्याचे बालविकास विभागाच्या कर्मचाºयांचे म्हणणे होते. सोनालीच्या आईने सांगितले की, माझी मुलगी कुपोषितच होती, तिला अंगणवाडीतून खाऊसुद्धा दिला जात होता. डिसेंबर २०१६मध्ये कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सुरू केलेल्या बाल उपचार केंद्रात उपचारसुद्धा घेतले होते.
सोनालीच्या मृत्यूसाठी आरोग्य विभाग व बालविकास विभागच जबाबदार असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.
दरम्यान, शबरी घरकूल योजनेतून या कुटुंबाला पक्के घर आणि घरगुती उद्योगासाठी कर्ज देऊ, असे आश्वासन प्रकल्प अधिकारी केंद्रे यांनी दिले. या वेळी सहायक प्रकल्प अधिकारी पवार, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या निशिगंधा भवार, दिशा केंद्राचे अशोक जंगले, रवि भोई, स्थानिक लक्ष्मण दरवडा, रवि दरवडा आदी उपस्थित होते.

Web Title: Sonal's family members took a meeting with the project officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.