- आविष्कार देसाईअलिबाग : नूतनीकरणासाठी तब्बल दहा कोटी रुपये खर्च करणाऱ्या जिल्हा सरकारी रुग्णालयातील सोनोग्राफी विभाग डॉक्टर उपलब्ध नसल्याने गेल्या पाच महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोप-यातून उपचारासाठी येणाºया रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय सोनोग्राफ्री करण्यासाठी खासगी केंद्रांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाची इमारत १९८० मध्ये बांधण्यात आली आहे. ३८ वर्षांत इमारतीवर डागडुजी, नूतनीकरणासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला आहे. चारच वर्षापूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या इमारत नूतनीकरणासाठी १० कोटी रुपये खर्च केले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील रुग्णालयामध्ये विविध सोयी-सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येत आहे.जिल्ह्याच्या कानाकोपºयातून रुग्ण विविध उपचारासाठी येथे येतात. मात्र अपुºया मनुष्यबळाअभावी रुग्णांची गैरसोय होत आहे.जिल्हा सरकारी रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात काम करणारे डॉक्टर लहू डांगे यांची बदली ठाणे येथे झाल्याने हे पद रिक्त आहे. जून २०१८ पासून या ठिकाणी डॉक्टर नाही. त्यांच्या जागी एका महिला डॉक्टरची नेमणूक करण्यात आली होती. मात्र त्यांनीही काही दिवसाताच रामराम ठोकला. डॉक्टरच नसल्यामुळे सोनोग्राफी विभाग रुग्णालय प्रशासनाने बंद ठेवला आहे. ‘डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे सोनोग्राफी विभाग बंद ठेवण्यात येत आहे’ अशा आशयाची सूचना दरवाजावर चिटकवून रुग्णालय प्रशासनाने आपली जबाबदारी झटकली आहे.जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये दररोज सरासरी ४० रुग्ण तपासणीसाठी येतात. याचाच अर्थ गेल्यापाच महिन्यात किमान ५ हजार ६०० रुग्णांची सोनोग्राफी सरकारी रुग्णालयात होऊ शकली नाही. सोनोग्राफी विभाग बंद असल्याने त्यांना खासगी सोनोग्राफी सेंटरवर जावे लागत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.राष्टÑवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारासरकारी रुग्णालयात उपचार घेणारे बहुतांश रुग्ण गरीब गरजू आहेत. हातावर पोट असणाºया रुग्णांना खासगी केंद्रातील सोनोग्राफीचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने तातडीने सोनोग्राफी विभागासाठी डॉक्टर उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अलिबाग तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिर्के यांनी दिला आहे. याप्रश्नी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांची सोमवारी भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.सरकारकडे सोनोग्राफी विभागासाठी डॉक्टर देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप पूर्तता झालेली नाही. याबाबत पाठपुरावा सुरू आहे.- डॉ.अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक
जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी विभाग बंद; पाच महिन्यांपासून डॉक्टर नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 12:16 AM