भाजीपाल्याच्या दराचा आलेख चढताच; रायगडमध्ये मागणी पुरवठ्यामध्ये तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:26 AM2020-07-22T00:26:57+5:302020-07-22T00:27:03+5:30

शेतकऱ्यांकडून कमी दराने उचल, बाजारात चढ्या दराने विक्री, गृहिणी नाराज

As soon as the price of vegetables goes up; Difference in supply and demand in Raigad | भाजीपाल्याच्या दराचा आलेख चढताच; रायगडमध्ये मागणी पुरवठ्यामध्ये तफावत

भाजीपाल्याच्या दराचा आलेख चढताच; रायगडमध्ये मागणी पुरवठ्यामध्ये तफावत

Next

- आविष्कार देसाई ।

रायगड : कोरोनामुळे सातत्याने लॉकडाऊन करण्यात येत आहे. परिणामी, अत्यावश्यक वस्तुंच्या किमती गगनाला भिडत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्हाबंदीमुळे वाहनांची वाहतूक रोडावल्याने भाजीपाल्याच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये कमालीची तफावत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडून कमी दरामध्ये शेतमालाची उचल करून, तोच शेतमाल किरकोळ बाजारात चढ्या दराने विकला जात आहे. त्याचा विपरित परिणाम हा गृहिणींच्या आर्थिक बजेटवर होत आहे.

मार्च महिन्यापासून ते जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लॉकडाऊन सुरू होता. त्यामुळे सर्वत्रच व्यवहार ठप्प झाले होते. कालांतराने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, त्यामध्ये शिथिलता आणत, व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले, तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. याची दखल घेत, रायगड जिल्ह्यामध्ये १६ ते २६ जुलै, २०२० या कालावधीत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन करण्याआधी नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सरकार आणि प्रशासनाने दोन दिवसांचा अवधी दिला होता. याच कालावधीत भाज्यांचे दर चांगलचे वधारले.

लॉकडाऊन पुन्हा वाढण्याच्या भीतीने नागरिकांनी दोन आठवडे पुरेल, एवढा साठा करण्यावर भर दिल्याने भाजी विक्रे त्यांचेही चांगलेच फावले. त्यांनी लगेचच भाजीपाला आणि फळांच्या किमती आव्वाच्या सव्वा वाढवल्या. मात्र, जीवनावश्यक वस्तू घेणे आवश्यक असल्याने, नागरिकांनी मिळेल त्या किमतीला वस्तू खरेदी केल्या. दोन महिन्यांपूर्वी आणि आताच्या दरामध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते.

मेथीची भाजी खातेय भाव

मेथीची भाजी आधी २० रु पयांना एक जुडी बाजारात मिळत होती. तिची किंमत आता ५०-६० रु पये जुडी झाली आहे. त्यामुळे पालेभाज्यांमध्ये सध्या मेथीची भाजी चांगलीच भाव खात आहे.

तिखट मिरचीचा झटकाच न्यारा

बाजारात तिखट मिरचीची किंमत ९० रुपये किलो होती. सध्या ती १३० रु पये किलोने विकली जात आहे. त्याचप्रमाणे, आधी कोथिंबिरीची जुडी २५ रु पयांना मिळायची, ती आता ६० रुपयांना मिळत आहे. आमटी आणि वरणाला फोडणी देण्यासाठी मिरची-कोथिंबिरीची नितांत गरज असल्याने गृहिणी त्यासाठी मागेल ती किंमत मोजत असल्याचे दिसते.

कोथिंबीरही ठरतेय वरचढ

बाजारात सध्या गावठी कोथिंबिरीला मोठी मागणी आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे शेतात उत्पादित केलेला माल लॉकडाऊनमुळे बाजारात विकला जाणार नाही. मात्र, कोथिंबीर बाजारात वरचढ ठरत आहे.

या कारणामुळे भाज्यांचे भाव वाढले

४मार्च महिन्यापासून जून महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. याच कालावधीमध्ये शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत होते. त्यांनी शेतामध्ये भाजीपाला पिकवलाच नाही. त्यामुळे बाजारात आवक चांगलीच घटली. ४ लॉकडाऊनमुळे विविध वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जिल्हाबंदीमुळे भाजीपाल्याची ने-आण करणाºया वाहनांचे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे पुरेशा प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होत नव्हता. शेतकºयांकडून कमी दराने भाजीपाल्याची खरेदी काही व्यापारी करत आहेत. बाजारात तुमचा माल विकला जाणार नाही, असे सांगत आहेत. तर किरकोळ व्यापारी हे तोच माल चढ्या दराने विकत आहेत.

कोरोनाच्या भीतीमुळे शेतकरी शेतामध्ये भाजीपाल्याचे पीक घेण्यास घाबरत आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे वाहतुकीवर बंधन आले. अचानक मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला, त्यामुळे भाजीपाला आणि फळांच्या किमतीमध्ये वाढ झाली. - राज ढवळे भाजीविक्रेता
कोरोनामुळे सातत्याने लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्यामुळे बाजार कधी बंद होईल, याबाबत काहीच सांगता येत नाही. त्यामुळे खरेदी करावी लागत आहे, परंतु अचानक वाढणाºया किमतीवर आणि साठा करणाºयांवर सरकार, प्रशासनाने निर्बंध लावले पाहिजेत. - अनंत पवार, ग्राहक

Web Title: As soon as the price of vegetables goes up; Difference in supply and demand in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.