शिवरायांच्या घोषाने दुमदुमला पद्मदुर्ग

By admin | Published: December 28, 2015 02:54 AM2015-12-28T02:54:20+5:302015-12-28T02:54:20+5:30

कोकणकडा मित्र मंडळ व मुरुड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर पद्मदुर्ग जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

Soumya's slogan Dudmulam Padmadurga | शिवरायांच्या घोषाने दुमदुमला पद्मदुर्ग

शिवरायांच्या घोषाने दुमदुमला पद्मदुर्ग

Next

नांदगाव : कोकणकडा मित्र मंडळ व मुरुड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर पद्मदुर्ग जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवकाळातील पेहराव केलेले असंख्य मावळे ‘शिवाजी महाराज की जय’चा जयघोष करीत ढाली व भाले घेऊन अवतरल्याने वातावरण बदलून शिवरायांचा काळ प्रत्यक्ष जागृत झाल्यासारखा वाटत होता.
कार्यक्रमाची सुुरुवात पर्यटन सभापती महेश भगत यांच्या हस्ते गडपूजन करून करण्यात आली. यावेळी कोकणकडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, दीपक शिंदे, पर्यटन महोत्सव अध्यक्ष नितीन आंबुर्ले, अभिजित सुभेदार, आंबा उत्पादक अध्यक्ष चंद्रकांत मोकल, सचिन करडे, शिक्षण सभापती प्रकाश सरपाटील व असंख्य स्थानिक नागरिक व पर्यटक उपस्थित होते. यावेळी पद्मदुर्ग किल्ल्यावर पारंपरिक गोंधळ, दांडपट्टा तसेच इतर शौर्याचे खेळ करण्यात आले. सर्व उपस्थित मावळ्यांनी पालखी सर्व बुरुजांवर फिरवून इतिहास जागृतीचा प्रयत्न केला.
यावेळी म्हसळे येथील सचिन करडे म्हणाले, की प्रत्येक मराठी माणसाने मराठी असल्याचा अभिमान बाळगा. एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसास मदत केलीच पाहिजे. दुष्यकृत्य करणाऱ्यांच्या विरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत. मराठी संस्कृती जपून महाराजांच्या आदर्श तत्त्वांवरून चालल्यास एक नवीन सुराज्य होण्यास वेळ लागणार नाही. प्राथमिक शिक्षक व इतिहास अभ्यासक सुग्रीव चव्हाण यांनी पद्मदुर्ग किल्ल्याचा इतिहास सांगितला. (वार्ताहर)

Web Title: Soumya's slogan Dudmulam Padmadurga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.