सब पोस्ट आॅफिसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:12 AM2019-01-03T00:12:28+5:302019-01-03T00:12:38+5:30

पाली हे सुधागड तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील सब पोस्ट आॅफिसात (उप डाक घर) सब पोस्ट मास्तरसह चार क्लार्क व एक पोस्टमनची जागा रिक्त आहे.

 Space for the staff in the Sub Post Office is empty | सब पोस्ट आॅफिसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी जागा रिक्त

सब पोस्ट आॅफिसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी जागा रिक्त

Next

राबगाव /पाली : पाली हे सुधागड तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील सब पोस्ट आॅफिसात (उप डाक घर) सब पोस्ट मास्तरसह चार क्लार्क व एक पोस्टमनची जागा रिक्त आहे. परिणामी, उपलब्ध कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडतो. तसेच लवकर काम न झाल्याने नागरिकांना एका कामासाठी सुद्धा कित्येक तास खोळंबावे लागते. तसेच कार्यालयात अनेक सुविधांचा अभाव आहे. प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने प्रगती साधत नवनवीन तंत्रयुक्त सुविधा निर्माण झाल्या असल्या, तरी आजही पोस्टआॅफिसवर अनेक कामे अवलंबून असतात. लोकसंख्येच्या तुलनेत येथील पोस्ट आॅफिसमधील रिक्त जागांमुळे नागरिकांना आवश्यक सेवा मिळण्यात अडसर निर्माण होत आहे.
येथील सब पोस्ट आॅफिसमध्ये एक सब पोस्ट मास्तर, पाच क्लार्क (कारकून) व दोन पोस्टमनच्या जागा उपलब्ध आहेत, त्यातही एका क्लार्क वर सब पोस्ट मास्तरचा अतिरिक्त कार्यभार दिला आहे. अपुºया अधिकारी आणि कर्मचाºयांच्या संख्येमुळे साध्या कामांसाठी सुद्धा लोकांना अनेक तास तिष्ठत राहावे लागते. मनिआॅर्डर, स्पीडपोस्ट, पार्सल देणे किंवा घेणे, पोस्ट तिकीट, लिफाफा अशा छोट्या कामांसाठीही खूप वेळ जातो.
उपलब्ध कर्मचाºयांना ही सर्व कामे करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. त्यांच्यावर हकनाक कामाचा ताण येतो. लोकांच्या प्रश्नांना व रोषालाही तोंड द्यावे लागते. त्यात सब पोस्ट मास्तरचे पद रिक्त असल्याने कर्मचाºयांवर नीट देखरेख ठेवली जात नाही. दरम्यान, येथील रिक्त जागा भरण्यासाठी अनेक वेळा जिल्हा पोस्ट कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उशिरापर्यंत काम करतो. उपलब्ध कर्मचारी सर्वच कामे करीत असल्याचे भागवत शिंदे, क्लार्क तसेच सब पोस्ट मास्तरचा अतिरिक्त कार्यभार, पाली सब पोस्ट आॅफिस यांनी सांगितले.

सुविधांचा अभाव
येथील पोस्ट आॅफिसमध्ये अनेक दिवसांपूर्वीच एटीएम सेवा सुरू झाली आहे. मात्र, सेवेचा लाभ घेण्यासाठी एटीएम मशिनच अजून येथे बसविण्यात आलेले नाही. येथील प्रिंटरदेखील खराब झाला आहे, त्यामुळे विविध बुकांवर वेळीच नोंदी करता येत नाहीत, पावत्या देता येत नाहीत, ग्राहकांना व्याजाची रक्कम दिसत नाही, बुकावरील आकडे कळत नाहीत, तसेच वारंवार इंटरनेट गेल्याने अनेक कामे तशीच खोळंबून राहतात, त्यामुळे पोस्टवर भरोसा असूनसुद्धा अशा गैरसोईमुळे ग्राहक गुंतवणूक व इतर कामांसाठी दुसरा पर्याय शोधतात. परिणामी, शासनाचे मोठे नुकसान होते. पोस्ट कार्यालयाच्या बाहेर लावलेले नामफलक देखील जीर्ण झाले आहे. त्यावरील रंग आणि मजकूरही पूर्णपणे अस्पष्ट झाला आहे. त्यामुळे नवीन माणसास आॅफिस शोधणे अवघड होते.

ग्राहकांसोबतच एजंटलासुद्धा तासन्तास थांबावे लागते. एफडी वेळेवर होत नाही. सीआयएफ नंबर काढता येत नाही. केव्हीपी, एमआयएस, टीडी आणि एनएसीच्या पुस्तकांवर एक - दीड महिन्यांनी प्रिंट करून मिळते. सर्वच कामांना खूप उशीर लागतो, त्यामुळे काय उत्तर द्यावे हा प्रश्न पडतो. त्यामुळे लवकर येथील रिक्त जागा भरण्यात याव्यात.
- पंकज शहा, अध्यक्ष, अल्पबचत प्रतिनिधी संघटना, पाली-सुधागड

येथील रिक्त जागा भरण्यासाठी अनेक वेळा जिल्हा पोस्ट कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उशिरापर्यंत काम करतो. उपलब्ध कर्मचारी सर्वच कामे करतो.
- भागवत शिंदे, क्लार्क तसेच सब पोस्ट मास्तरचा अतिरिक्त कार्यभार, पाली पोस्ट आॅफिस

Web Title:  Space for the staff in the Sub Post Office is empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.