- जयंत धुळप अलिबाग : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्वस्तरातील नागरिकांनी आणि समाजघटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी येथे केले.जिल्ह्यात हागणदारीमुक्तीमध्ये काहीशा मागे असलेल्या कर्जत तालुक्यात स्वत: जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अलिबाग तालुक्यास रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे यांनी तर पेण तालुक्यास निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी दत्तक घेवून हे तिन्ही तालुके २ आॅक्टोबरपूर्वी संपूर्ण हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.‘स्वच्छता हीच सेवा’ मोहिमेंतर्गत शुक्र वारी १५ सप्टेंबर रोजी शहरी भागाच्या मोहिमेचा शुभारंभ आरसीएफ विद्यालय येथे सकाळी नऊ वाजता होईल तर नगरपालिका शाळा क्र मांक १ येथून स्वच्छता जनजागृती दिंडी काढण्यात येईल. ग्रामीण भागाच्या कार्यक्र माचा शुभारंभ तुपगाव (ता. खालापूर) येथे होईल.शनिवारी १६ रोजी आंतरराष्ट्रीय क्लिन कोस्ट दिनानिमित्त अलिबाग येथील समुद्र किनाºयावरील परिसराची स्वच्छता श्रमदानातून करण्यात येईल. तर रविवारी १७ सप्टेंबरला सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत श्रमदान करु न सेवा दिवस साजरा करण्याचे नियोजन आहे. २४ सप्टेंबरला सर्व घटकांना श्रमदानात सहभागी करून समग्र स्वच्छता अभियान होणार आहे.सोमवारी २५ सप्टेंबर रोजी शहरातील हॉस्पिटल, उद्याने, पुतळे व स्मारके, बस थांबे, तलाव आणि स्वच्छतागृहांची सफाई करून सर्वत्र स्वच्छता करण्यात येणार आहे. रविवार १आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील शहरातील प्रसिद्ध स्थळांच्या ठिकाणी व्यापक स्वच्छता मोहीम होणार आहे. गांधी जयंती सोमवार २ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व नागरी भाग हागणदारीमुक्त घोषित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.१- शहरातील सर्व कुटुंब, रहिवासी कल्याण संघ व मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाºयामार्फत कचरा निर्मितीच्या जागीच कचºयाचे विलगीकरण करण्याच्या मोहिमेस प्रारंभ करण्यात येईल.२- शहरातील सर्व कुटुंबांना व भाजी मंडई, बाजार संघटना, वाणिज्यक क्षेत्रामध्ये सुक्या व ओल्या कचºयासाठी वेगवेगळ्या रंगाच्या कचरा कुंड्यांचे प्रमाणावर वाटप करण्यात येणार आहे. भाजी मंडई, बाजार स्थळे इत्यादी ठिकाणी दुकानदार व व्यापाºयांच्या सोबतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल.३- सर्व ऐतिहासिक वारसा स्थळे, जलस्रोत, पाणीसाठे, पर्यटन स्थळे आदी ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता मोहीम होईल. शालेय विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात स्वच्छता शपथ देण्यात येईल.४- रहिवासी कल्याण संघ व रहिवासी वसाहतीमार्फत व्यापक परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. बहुराष्ट्रीय कंपन्या व इतर कॉर्पोरेट कार्यालयांनी, त्यांच्या कार्यालयीन परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येईल.५- शहरातील नवीन बांधलेल्या अथवा नूतनीकरण केलेल्या सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांचे उद्घाटन करु न ती जनतेसाठी खुली करण्यात येतील,असेही त्यांनी सांगितले.स्वच्छ भारत अभियानात रायगड प्रगतिपथावरस्वच्छ भारत नागरी अभियानांतर्गत जिल्ह्यातील १० नगरपालिका व ५ नगरपंचायती संपूर्ण हागणदारीमुक्त झाल्या असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे यांनी दिली. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण विभागात जिल्ह्यात एकूण ३ लाख ४३ हजार ४२२ कुटुंबे असून यापैकी ९४.५५ टक्के म्हणजे ३ लाख २४ हजार ६९९ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये आहेत. १८ हजार ७२३ कु टुंबांकडे शौचालये नाहीत त्यांच्याकडे ती २ आॅक्टोबर पूर्वी बांधण्यात येतील त्याच बरोबर जिल्ह्यात ७९६ ग्रामपंचायती असून त्यापैकी ६४० ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत, उर्वरित १५६ ग्रामपंचायती २ आॅक्टोबर पर्यंत हागणदारीमुक्तचे नियोजन केले असल्याचे डॉ.गोटे यांनी सांगितले.१० तालुके हागणदारीमुक्तजिल्ह्यातील १० तालुके संपूर्ण हागणदारीमुक्त झाले आहेत. कर्जत तालुक्यात ८२.८८ टक्के, पेण ८८.५२ टक्के तर अलिबाग ९०.३२ टक्के हागणदारीमुक्तीचे काम झाले आहे. हे तीनही तालुके आता वरिष्ठ अधिकाºयांनी दत्तक घेतले असल्याने ते लवकरच १०० टक्के हागणदारीमुक्त होतील असा विश्वास डॉ.गोटे यांनी व्यक्त केला.
हागणदारीमुक्तीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, ‘स्वच्छता हीच सेवा’ ही विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 6:22 AM