आरक्षण सोडतीसाठी आज विशेष बैठक
By admin | Published: October 7, 2015 12:07 AM2015-10-07T00:07:39+5:302015-10-07T00:07:39+5:30
नगरपंचायतीच्या प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्र म जाहीर झाला आहे. बुधवारी ७ आॅक्टोबर रोजी कर्जतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली
खालापूर : नगरपंचायतीच्या प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्र म जाहीर झाला आहे. बुधवारी ७ आॅक्टोबर रोजी कर्जतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली खालापूर पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे लवकरच नगरपंचायतीच्या निवडणुकांना खालापूरमधील ग्रामस्थांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
खालापूर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने ग्रामपंचायत बरखास्त झाली असून, खालापूरचा कारभार सध्या प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार शशिकांत नाचण यांच्याकडे आहे. खालापूरमध्ये लोकनियुक्त लोकप्रतिनिधी नसल्याने विकासकामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे लवकर निवडणुका व्हाव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
खालापूरमध्ये एकूण १७ प्रभाग असून, या प्रभागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या सदस्यांसाठी आरक्षण काढले जाणार आहे. यावेळी खालापूरमधील सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार शशिकांत नाचण यांनी केले आहे.
खालापूर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाल्याने ग्रामपंचायत बरखास्त झाली असून, खालापूरचा कारभार सध्या प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार शशिकांत नाचण यांच्याकडे आहे.