जिंकलस भावा... सेरेब्रल पाल्सीग्रस्त ऋ षीकेश माळीचे नेत्रदीपक यश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 06:48 AM2019-06-09T06:48:15+5:302019-06-09T06:48:31+5:30

दिव्यांग प्रवर्गात प्रथम : शिक्षकांसह सर्व स्तरांतून कौतुक

The spectacular success of the Cerebral Palsy-hit Rishikesh Mali | जिंकलस भावा... सेरेब्रल पाल्सीग्रस्त ऋ षीकेश माळीचे नेत्रदीपक यश

जिंकलस भावा... सेरेब्रल पाल्सीग्रस्त ऋ षीकेश माळीचे नेत्रदीपक यश

Next

अलिबाग : लहानपणी बोलता येत नव्हते, हात-पायात पीळ होता, डोळे तिरळे होते, धड बसताही येत नव्हते, अशी बहुविकलांगतेची लक्षणे असलेल्या सेरेब्रल पाल्सी या असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या म्हसळेतील न्यू इंग्लिश स्कूलचा ऋषीकेश सुदाम माळी या विद्यार्थ्याने दहावीत ५०० पैकी ४३३ गुण अर्थात ८६.६० टक्के गुण मिळवून दिव्यांग प्रवर्गात प्रथम क्रमांक पटकावला.

पाष्टी शाळेतील शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन, प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या सरावाबरोबरच आईवडिलांनी व्यायाम, फिजिओथेरेपी, योगासने, आहार व आरोग्य याची घेतलेली काळजी, सायकलिंग व नियमित चालणे, गायन इत्यादीवर मेहनत घेतल्याचे ऋषीकेश सांगतो.
विज्ञानातील ‘स्टेम-सेल थेरेपी’ या आधुनिक उपचाराचा त्याने जानेवारी महिन्यात अनुभव घेतला. उपचारानंतर मार्च महिन्यात थेरेपी व सततच्या बसण्यामुळे पाठदुखी बळावली. मात्र, तरीही बोर्डाकडून मंजूर असलेल्या लेखनिकाची मदत न घेता त्याने स्वत: पेपर लिहिले.
अधिकारी बनण्याचे स्वप्न...

भविष्यात पुढील शिक्षण जिद्दीने पूर्ण करून ऋषीकेशला अधिकारी बनवून दिव्यांग व खासकरून सेरेब्रल पाल्सीग्रस्त पाल्य व पालक यांचे मनोबल उंचावण्यासाठी काम करण्याची इच्छा असल्याचे त्याची आई शीतल माळी व वडील पी.एन.पी. शाळेचे मुख्याध्यापक सुदाम माळी यांनी सांगितले.
 

Web Title: The spectacular success of the Cerebral Palsy-hit Rishikesh Mali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड