फणसाडमध्ये जाळ रेषा काढण्याच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:57 AM2019-12-30T00:57:22+5:302019-12-30T00:57:24+5:30

५४ किलोमीटरचा परिसर; वनसंपदा, प्राण्यांच्या रक्षणासाठी उपाययोजना

Speed up the mesh line | फणसाडमध्ये जाळ रेषा काढण्याच्या कामाला वेग

फणसाडमध्ये जाळ रेषा काढण्याच्या कामाला वेग

Next

मुरुड : तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात सुमारे ५४ किलोमीटर परिसरात व्याप्त असे फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे. मुंबईपासून
१६० किलोमीटर अंतरावर पनवेल- पेण व अलिबाग मार्गावर विस्तीर्ण असे फणसाड अभयारण्य म्हणजे निसर्गाचे एक वरदान आहे. नवाब काळापासून हे शिकार क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून या ठिकाणी वन्यजीवांचे संरक्षण व वृक्षतोडीला प्रतिबंध बसला आहे. येथील वनसंपदेचे, प्राण्यांचे रक्षण होण्यासाठी जाळ रेषा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

विस्तीर्ण अशा या अभयारण्यात साग व निलगिरीची उंच अशी भलीमोठी झाडे असल्याने कडक उन्हातही दाट सावली या भागात आढळून येते. औषधी वनस्पतीसुद्धा या ठिकाणी आढळून येतात. ९० प्रकारची फुलपाखरे येथे बागडताना दिसतात. पक्षाच्या १६४ प्रजाती या ठिकाणी आढळतात. फणसाड अभयारण्यात रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, त्रास, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, बिबट्या आदी वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. पर्यटकांचे व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू (मोठी खार) सुद्धा येथे आहे.
निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे गिधाडे येथे मोठ्या संख्येने आढळतात. महाराष्ट्रात एकूण ३१ अभयारण्ये असून सर्वात दुर्मीळ असा शेकरू हा प्राणी आढळून येतो. उंच अशा निलगिरीच्या झाडावर या अभयारण्यात ३२ घरटी आढळून आलेली आहेत.
निसर्गरम्य अशा या फणसाड अभयारण्यात सध्या त्यांच्या हद्दीत जळीत रेषा काढण्याच्या कामाला वेग आलेला आहे.

वणव्यांपासून बचावासाठी उपाययोजना
वातावरण बदलते असून केव्हाही अशा वातावरणात वणवे लागण्याची शक्यता असते. वन्यजीवांकडून कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाळ रेषा काढण्याचे काम सुरु केले आहे. जेणेकरून जंगल सुरक्षित राहावे व त्यामधील प्राणी, पशुपक्षी व वनसंपदा धोक्यात येऊ नये यासाठी जाळ रेषा खूप उपयुक्त आहे.

जाळ रेषा काढणे म्हणजेच फणसाड अभयारण्य क्षेत्रातील रस्त्याच्या कडेला असणारा भूभाग, येथे सुकलेले गवत व पालापाचोळा असतो. रस्त्यावरून जाणाºया व येणाºया एखाद्या सिगरेट पिणाºया व्यक्तीने चुकून जर का सिगरेट अथवा माचिस काडी टाकल्यास सुके गवत तातडीने पेट घेऊन ही आग जंगलभागाच्या चहूबाजूला पकडली जाऊ शकते. यासाठी रस्त्याकडेला असणाºया भागात प्रथम जळीत रेषा काढून या भागातील सुक्या गवताला जाळले जाते ज्यामुळे जंगल सुरक्षित राहण्यास मदत होते.

जळीत रेषा काढण्याचे काम फणसाड अभयारण्यात दरवर्षी केले जाते. वनमजूर वनरक्षक व वनपाल हे जळीत रेषा काढण्यासाठी विशेष मेहनत घेत असतात. अभयारण्यातील वन्यजीव सुरक्षित रहावे व जंगल संपत्तीचे जतन व्हावे यासाठी जळीत रेषा काढणे खूप आवश्यक आहे. ५४ किलोमीटर परिक्षेत्रातील काही भागात जळीत रेषा काढण्याचे काम वेगात सुरु आहे.
- राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी

Web Title: Speed up the mesh line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.