शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

फणसाडमध्ये जाळ रेषा काढण्याच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:57 AM

५४ किलोमीटरचा परिसर; वनसंपदा, प्राण्यांच्या रक्षणासाठी उपाययोजना

मुरुड : तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात सुमारे ५४ किलोमीटर परिसरात व्याप्त असे फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे. मुंबईपासून१६० किलोमीटर अंतरावर पनवेल- पेण व अलिबाग मार्गावर विस्तीर्ण असे फणसाड अभयारण्य म्हणजे निसर्गाचे एक वरदान आहे. नवाब काळापासून हे शिकार क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून या ठिकाणी वन्यजीवांचे संरक्षण व वृक्षतोडीला प्रतिबंध बसला आहे. येथील वनसंपदेचे, प्राण्यांचे रक्षण होण्यासाठी जाळ रेषा काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.विस्तीर्ण अशा या अभयारण्यात साग व निलगिरीची उंच अशी भलीमोठी झाडे असल्याने कडक उन्हातही दाट सावली या भागात आढळून येते. औषधी वनस्पतीसुद्धा या ठिकाणी आढळून येतात. ९० प्रकारची फुलपाखरे येथे बागडताना दिसतात. पक्षाच्या १६४ प्रजाती या ठिकाणी आढळतात. फणसाड अभयारण्यात रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, साळींदर, त्रास, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, माकड, बिबट्या आदी वन्यजीव मोठ्या संख्येने आहेत. पर्यटकांचे व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू (मोठी खार) सुद्धा येथे आहे.निसर्गाच्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे गिधाडे येथे मोठ्या संख्येने आढळतात. महाराष्ट्रात एकूण ३१ अभयारण्ये असून सर्वात दुर्मीळ असा शेकरू हा प्राणी आढळून येतो. उंच अशा निलगिरीच्या झाडावर या अभयारण्यात ३२ घरटी आढळून आलेली आहेत.निसर्गरम्य अशा या फणसाड अभयारण्यात सध्या त्यांच्या हद्दीत जळीत रेषा काढण्याच्या कामाला वेग आलेला आहे.वणव्यांपासून बचावासाठी उपाययोजनावातावरण बदलते असून केव्हाही अशा वातावरणात वणवे लागण्याची शक्यता असते. वन्यजीवांकडून कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जाळ रेषा काढण्याचे काम सुरु केले आहे. जेणेकरून जंगल सुरक्षित राहावे व त्यामधील प्राणी, पशुपक्षी व वनसंपदा धोक्यात येऊ नये यासाठी जाळ रेषा खूप उपयुक्त आहे.जाळ रेषा काढणे म्हणजेच फणसाड अभयारण्य क्षेत्रातील रस्त्याच्या कडेला असणारा भूभाग, येथे सुकलेले गवत व पालापाचोळा असतो. रस्त्यावरून जाणाºया व येणाºया एखाद्या सिगरेट पिणाºया व्यक्तीने चुकून जर का सिगरेट अथवा माचिस काडी टाकल्यास सुके गवत तातडीने पेट घेऊन ही आग जंगलभागाच्या चहूबाजूला पकडली जाऊ शकते. यासाठी रस्त्याकडेला असणाºया भागात प्रथम जळीत रेषा काढून या भागातील सुक्या गवताला जाळले जाते ज्यामुळे जंगल सुरक्षित राहण्यास मदत होते.जळीत रेषा काढण्याचे काम फणसाड अभयारण्यात दरवर्षी केले जाते. वनमजूर वनरक्षक व वनपाल हे जळीत रेषा काढण्यासाठी विशेष मेहनत घेत असतात. अभयारण्यातील वन्यजीव सुरक्षित रहावे व जंगल संपत्तीचे जतन व्हावे यासाठी जळीत रेषा काढणे खूप आवश्यक आहे. ५४ किलोमीटर परिक्षेत्रातील काही भागात जळीत रेषा काढण्याचे काम वेगात सुरु आहे.- राजवर्धन भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी