शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
4
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
5
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
6
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
7
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
8
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
9
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
10
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
11
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
12
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
13
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
14
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
15
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
16
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
17
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
18
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
19
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
20
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ

‘झोपु’च्या हालचालींना वेग

By admin | Published: November 14, 2015 2:21 AM

पनवेल शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याकरिता केंद्र शासन पुरस्कृत राजीव आवास योजनेमध्ये पनवेल

प्रशांत शेडगे, पनवेलपनवेल शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याकरिता केंद्र शासन पुरस्कृत राजीव आवास योजनेमध्ये पनवेल नगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे. सिडकोकडून जागा देण्यास टाळाटाळ करण्यात येत असली तरी पालिका प्रशासन ‘झोपु’ योजनेकरिता उत्सुक असल्याचे दिसत आहे. पनवेल परिसरात अनेक नवनवीन प्रकल्प येत आहेत. रोजगार सहज उपलब्ध होत असल्याने नोकरी-धंद्यानिमित्त स्थलांतरितांचे प्रमाणही अधिक आहे. परिणामी झोपडपट्ट्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पनवेल पालिका आणि सिडको हद्दीतील झोपड्यांमुळे काही प्रकल्प आणि विकासकामात अडथळा येत आहे. तत्कालीन नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या काळात ‘झोपडपट्टीमुक्त पनवेल’ हा संकल्प करण्यात आला. त्यांनी न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या भूखंडावर झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव पुढे केला. मात्र पुराचा मुद्दा पुढे आल्याने हा प्रस्ताव मागे पडला, त्यानंतर शहरातील झोपड्यांचा बायोमेट्रिक सर्व्हे करून पुनर्वसनाचा प्रस्ताव पुढे आला. त्यावेळी एकात्मिक झोपडपट्टी पुनर्वसन घरकूल योजनेसाठी पालिकेने सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे जागेसाठी पाठपुरावा केला. मात्र सिडकोने दुर्लक्ष करीत पालिका प्रशासनाला झोपडपट्टीकरिता जागा हस्तांतरित केली नाही.पनवेल रेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण होत असून यात पंचशीलनगर, मालधक्का व नवनाथनगर येथील झोपड्यांचा विकासात अडथळा येत आहे. तर पनवेल बसस्थानकालाही लक्ष्मी वसाहत, इंदिरानगर, शिवाजीनगर या भागातील झोपड्यांनी गराडा घातला आहे. त्याचबरोबर इलेव्हेटेड रोडचे कामही बाकी असून पंचायत समितीच्या इमारतीचे कामही संथ गतीने सुरू आहे. हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पनवेल शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प या अगोदरच करण्यात आला आहे. परंतु सिडकोकडून भूखंड मिळत नसल्याने झोपुचे काम रखडले असल्याचे झोपडपट्टी रहिवासी संघाचे अध्यक्ष भरत जाधव यांनी सांगितले.