पावसाच्या विश्रांतीने उत्स्फूर्त मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 11:39 PM2019-10-21T23:39:28+5:302019-10-21T23:40:09+5:30

वडवली येथील दिव्यांग मतदारांसाठी सोय

Spontaneous voting with rain rest | पावसाच्या विश्रांतीने उत्स्फूर्त मतदान

पावसाच्या विश्रांतीने उत्स्फूर्त मतदान

Next

दिघी : जिल्ह्यातील १९३ श्रीवर्धन विधानसभा निवडणुकासाठी मतदान होत असून, या मतदारसंघात १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यासाठी सोमवारी मतदान करण्यात आले. सातत्याने तीन दिवस पार पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने या वेळी सुविधापूर्व निवडणुकीला दिव्यांग मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक दिव्यांग बांधवांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी वडवली ग्रामपंचायतीकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. बोर्लीपंचतन येथील दोन उर्दू शाळा व चार मराठी शाळा अशा सहा केंद्रात मतदान होत असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६६ टक्के मतदान झाले होते.

या वेळी तालुक्यातील एकूण ९० मतदान केंद्र आहे. यामध्ये श्रीवर्धन विधानसभा क्षेत्र दिव्यांग मतदारांची एकूण संख्या १,८२८ इतकी आहे. तसेच तालुका मार्यदित दिव्यांग मतदार ५६४ आहेत. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत दिव्यांग बांधवांना घेऊन येण्याची गरज असताना यासाठी सुलभ निवडणुका या मतदानाच्या प्रक्रियेनुसार दिव्यांगांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

श्रीवर्धन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वडवलीचे ग्रामविकास अधिकारी प्रज्योत सुर्वे यांनी ग्रामपंचायत अपंग निधी अंतर्गत खर्च करीत दिव्यांग बांधव नीलेश नाक्ती आणि वडवलीतील दिव्यांग संघटनेच्या मदतीने दिव्यांगांसाठी स्वतंत्र रिक्षा वाहन व्यवस्था व अतिविकलांग दिव्यांगांकरिता व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. वडवलीमध्ये एकूण ५४ दिव्यांग मतदार आहेत. त्यामध्ये बहुविकलांग मतदार हे १७ आहेत. त्यामधील सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण ४६ दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पावसाच्या विश्रांतीने मतदान प्रक्रियेला येणारा अडथळा दूर झाला.

च्मतदानासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असल्याने सकाळपासूनच मतदारांनी आपले कर्तव्य बजावण्यासाठी गर्दी केली होती. मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे पथक (पोलिंग पार्टी) वेळेत हजर झाल्याने श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील मतदान केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांनी मतदारांसाठी आवश्यक सूचनाफलक लावले होते.

निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या ‘सुलभ निवडणुका’ मतदान प्रक्रियेमुळे आज प्रत्येक दिव्यांग मतदार सुखावला आहे. यामध्ये वाहन व्यवस्था, व्हीलचेअर आणि मदतनीसची सोय झाल्यामुळे आज माझा प्रत्येक दिव्यांग बांधव मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावल्याचे पाहून आनंद होत आहे. जो दिव्यांग बांधव यापूर्वी मतदानासाठी बाहेर पडत नव्हता तो आज या प्रक्रियेचा अमूल्य भाग झाला आहे, ही एक अभिमानास्पद बाब असल्याचे दिव्यांग मतदार नीलेश नाक्ती यांनी सांगितले.

Web Title: Spontaneous voting with rain rest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.