क्रीडा संकुल अखेर ताब्यात; जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:28 AM2020-02-24T00:28:26+5:302020-02-24T00:28:29+5:30

गतवर्षी एप्रिलपासून होते पोलीस पहाऱ्यात

Sports packages eventually occupied; Satisfaction among District players | क्रीडा संकुल अखेर ताब्यात; जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये समाधान

क्रीडा संकुल अखेर ताब्यात; जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये समाधान

Next

अलिबाग : लोकसभा आणि पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे मतमोजणीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलाचा गुरुवारी २० फेबुवारीला अधिकृतरीत्या जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे ताबा सोपविण्यात आला. क्रीडा संकुलातील जिल्हा क्रीडा कार्यालय तसेच वसतिगृहात इलेक्ट्रिक मत मशिन्स ठेवण्यात आल्याने या भागाचे स्ट्राँगरूममध्ये रूपांतर करण्यात आले होते. लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभा निवडणुका आल्याने एप्र्रिलमध्ये ताब्यात घेतलेली इमारत तब्बल १० महिन्यांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर पोलीस पहारा हटवत पुन्हा क्रीडा कार्यालयाच्या ताब्यात दिली आहे.

लोकसभेच्या निवडणूक काळात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलाचा ताबा घेत ईव्हीएम ठेवण्यासाठी स्ट्राँगरूम तयार केली. त्यामुळे जवळजवळ तीन-चार महिने हे क्र ीडा संकुल खेळाडूंसाठी बंदच झाले. खेळाडू सोडा, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांनादेखील काही परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती.

जिल्हा क्रीडा कार्यालय असणाºया इमारतीतच ही स्ट्राँगरूम असल्याने दहा महिन्यांसाठी हे कार्यालयदेखील इतर विभागात हलविण्यात आले. प्रवेशबंदी असल्याने वापराविना जलतरण तलावाची तर अत्यंत वाईट अवस्था झाली होती. विधानसभेच्या मतमोजणीनंतर तरणतलाव स्वच्छ करताना कर्मचाºयांची प्रचंड दमछाक झाली. वापराविना मोठ्या प्रमाणावर शेवाळ झाल्याने एवढी भयानक अवस्था झाली होती की, तीन तीन पाण्याचे पंपही नादुरु स्त झाले. अथक प्रयत्नांनी तरणतलाव लवकरच पुन्हा एकदा जलतरणपटूंसाठी सज्ज असेल, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला होता. मात्र अजूनही तरणतलाव खुले नसल्याचे कळते.

यासंदर्भात निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी वैशाली माने यांच्याशी संपर्क साधला असता, उच्च न्यायालयाकडून आलेल्या पत्रानंतरच ईव्हीएम हलविले जात असल्याने तोपर्यंत ताबा दिला नसल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच सदर पत्र प्राप्त होताच कार्यवाही करीत ईव्हीएम मशीन सुरक्षितरीत्या सर्व सोपस्कार पार पाडून सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत. मात्र काही महत्त्वाची कागदपत्रे स्ट्राँगरूममध्येच असल्याने ४/५ दिवस पोलीस पहारा काढण्यात आला नव्हता. बुधवार १९ फेब्रुवारी रोजीपर्यंत असलेला पोलीस पहारा २० फेब्रुवारी रोजी काढण्यात आल्याने क्रीडा संकुलाने मोकळा श्वास घेतल्याची प्रतिक्रि या क्र ीडा क्षेत्रातील प्रशिक्षक व खेळाडू यांनी दिली. क्रि केट मैदानाची खेळपट्टी तसेच धावपट्टीची झालेली दुरवस्थादेखील सुधारण्याची गरज आहे. लवकरच पुन्हा एकदा हे क्र ीडा संकुल जिल्ह्यातील खेळाडूंसाठी उभे राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संपूर्ण क्र ीडा संकुलाच्या स्वच्छता व दुरु स्तीचे काम सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या ताब्यातून पूर्णपणे जिल्हा क्र ीडा कार्यालयाकडे ताबा आला आहे. मात्र उर्वरित कामे पूर्ण होऊन लवकरच खेळाडूंसाठी पुन्हा एकदा क्र ीडा संकुल खुले होईल.
- अंकिता मयेकर, जिल्हा क्र ीडा अधिकारी

Web Title: Sports packages eventually occupied; Satisfaction among District players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.