मतदानाच्या दिवशी सर्वांची ऑन द स्पाॅट आराेग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 01:58 AM2021-01-10T01:58:19+5:302021-01-10T01:58:35+5:30

रायगड जिल्ह्यात निवडणुकीसाठी आराेग्य यंत्रणेलाही घेतले हाताशी

On-the-spot health check-up for all on polling day | मतदानाच्या दिवशी सर्वांची ऑन द स्पाॅट आराेग्य तपासणी

मतदानाच्या दिवशी सर्वांची ऑन द स्पाॅट आराेग्य तपासणी

Next

रायगड:  काेराेना महामारीचा कहर अद्यापही पूर्णतः थांबलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला हाेत आहेत. अधिकारी, कर्मचारी, उमेदवार आणि मतदार यांची काेराेना चाचणी मतदानाच्या दिवशीच ऑन द स्पाॅट हाेणार आहे.

जिल्ह्यामध्ये काेराेना संसर्ग झाल्याचा पहिला रुग्ण ८ मार्च राेजी सापडला हाेता. त्यानंतर, काेराेनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच गेला हाेता. जून आणि सप्टेंबर महिन्यामध्ये प्रामुख्याने रुग्णवाढीचा स्फाेट झाला हाेता. त्यामुळे सर्वत्रच चिंतेचे वातावरण हाेते. आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली नसली, तरी काेराेनाचा कहर पूर्णपणे थांबलेला नाही. काहीच दिवसांनी जिल्ह्यामध्ये काेराेनाची लस दाखल हाेणार आहे.  याच पार्श्वभूमीवर १५ जानेवारीला जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका हाेत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चाकरमानी माेठ्या संख्येने हजेरी लावतात. त्यामुळे काेराेनाचा संसर्गाचा धाेका राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काेराेनाचे नियम पाळून निवडणुका घेण्याचे निर्देश निवडणूक आयाेगाने दिलेले आहेत. 

जिल्ह्यात ७८ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची निवड
७८ निवडणूक अधिकाऱ्यांची जिल्ह्यात निवड केली आहे. निवडणुका निकाेप पार पाडण्याची जबाबदारी आहे. काेराेना नियमांचे काटेकाेरपणे पालन करण्यात येत आहे का, याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. अधिकाऱ्यांना स्वतःसह आपल्या सहकाऱ्यांची, तसेच मतदार आणि उमेदवारांची ऑन द स्पाॅट तपासणी करायची आहे. एखाद्या केंद्रावर आराेग्याच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित झाल्यास, अन्य कर्मचाऱ्याला पाठविण्यात येणार आहे. तर, २० टक्के अतिरिक्त मनुष्य बळ राखल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घेतली
अधिकारी, कर्मचारी यांनी प्रथम स्वतःच्या आराेग्याची तपासणी करून घ्यायची आहे. त्यानंतर, उमेदवार, मतदार यांची तपासणी करायची आहे. त्यासाठी लागणारे सॅनिटायझर, शरीराचे तापमान माेजणारे यंत्र सज्ज ठेवायचे आहे, तसेच नाका-ताेंडाला मास्क आणि सामाजिक अंतर राखून मतदान प्रक्रिया पार पाडायची आहे.

Web Title: On-the-spot health check-up for all on polling day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड