शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

रस्त्यामुळे अधिकाºयांना घेतले फैलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:01 AM

रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येत नाही तोपर्यंत तुमची खुर्ची आम्हाला द्या, काम पूर्ण झाल्यानंतर तुमची खुर्ची तुम्हाला सन्मानाने परत करण्यात येईल, अशी मागणी

अलिबाग : रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येत नाही तोपर्यंत तुमची खुर्ची आम्हाला द्या, काम पूर्ण झाल्यानंतर तुमची खुर्ची तुम्हाला सन्मानाने परत करण्यात येईल, अशी मागणी अलिबाग तालुका भाजपाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विलास पाटील यांच्याकडे केली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. भाजपा पदाधिकारी आक्रमक झाल्याने विलास पाटील यांची भंबेरी उडाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.अलिबाग-रेवदंडा रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सुरु वात होईल, त्यामुळे ३० जुलै रोजी रेवदंडा पारनाका येथे करण्यात येणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित करावे, असे लेखी पत्र विलास पाटील यांनी गेल्या महिन्यात आंदोलकांना दिले होते.सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्यापही कामाला सुरु वात न केल्याने अलिबाग भाजपाचे पंचायत समिती सदस्य उदय काठे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पाटील यांची भेट घेतली. रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सस्ते यांनी ही बैठक घडवून आणली होती. अलिबाग-रेवदंडा मार्गाची झालेल्या दुरवस्थेची तातडीने पाहणी करा, रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येत नाही तोपर्यंत तुमची खुर्ची आम्हाला द्या, काम पूर्ण झाल्यानंतर तुमची खुर्ची तुम्हाला सन्मानाने परत करण्यात येईल, अशी मागणी उदय काठे यांनी लावून धरली. त्यावेळी विलास पाटील यांची खुर्ची काढून घेण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी तो हाणूनपाडला.आंदोलकांच्या मागणीकडे पाटील यांनी दुर्लक्ष केल्याने आंदोलक कमालीचे संतापले. त्यांनी पाटील यांच्यावर शाब्दिक हल्ला चढविला. खुर्चीत बसून जनतेची कामे करता येत नसतील तर खुर्च्या खाली करा, अशी मागणी भाजपाचे सतीश लेले यांनी केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरा आंदोलकांच्या संयमाचा बांध तुटला तर तुम्हाला कठीण जाईल. यासाठी आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी, चालेल, असेही लेले यांनी स्पष्टकेले.याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे अ‍ॅड.महेश मोहिते, दर्शन प्रभू, नीलेश महाडिक, अ‍ॅड. अंकित बंगेरा, राजेश पाटील, मनोज जैन, पुनीत शेठ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.